घरताज्या घडामोडीभारत –चीन संघर्ष: शहिद झालेल्या जवानांना विकी कौशलचा सलाम!

भारत –चीन संघर्ष: शहिद झालेल्या जवानांना विकी कौशलचा सलाम!

Subscribe

मागच्या ४५ वर्षात पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या संघर्षात  भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मोठा तणाव आहे. हा तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना सोमवारी रात्री अचानक गलवाण खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अभूतपूर्व संघर्ष उदभवला. चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत ठार झाले आहेत. या घटनेवर ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय सैनिकांचे कौतुक करत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisement -

“गलवाण खोऱ्यात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय सैनिकांना सलाम. देशाच्या सन्मानासाठी तुम्ही प्राणांचे बलिदान दिले. तुमच्या कुटुंबियांसाठी मी दु:ख व्यक्त करतो. जय हिंद.” अशा आशयाचे ट्विट करुन विकी कौशलने केलं आहे. आणि भारतीय शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नेमकं काय घडलं?

बफर झोनमध्येच गलवाण नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन वादाला सुरुवात झाली. १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. त्यामुळे  तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उदभवली.

- Advertisement -

हे ही वाचा – चीनच्या सैन्याचा लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी भारतीय सैन्यांवर हल्ला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -