Sardar Udham Singh चित्रपटात भगत सिंग यांची भूमिका करणार अमोल पाराशर

vicky kaushal share first look of amol parashar as sardar baghat singh in sardar udham singh
Sardar Udham Singh चित्रपटात भगत सिंग यांची भूमिका करणार अमोल पाराशर

विक्की कौशलचा चित्रपट ‘सरदार उधम सिंग’ अॅमेझोन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. क्रांतिकारी सरदार उधम सिंह यांच्या जीवनातील मुख्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. सरदार उधममध्ये अमोल पाराशर भारतीय स्वतंत्र संग्रामचे सर्वात चर्चित आणि लोकप्रिय शिपायांपैकी एक सरदार भगत सिंग यांची भूमिका करताना दिसणार आहेत. विक्की कौशलने अमोलच्या भूमिकेची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

विक्कीने शेअर केलेल्या फोटोमध्ये सरदार भगत सिंग यांच्या अंदाजात अमोल डोक्यावर पगडी बांधून दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विक्कीने लिहिले आहे की, ‘माझा गुरु, माझा मित्रा, माझा भाऊ….माझा भगत्या. शहीद भगत सिंग यांच्या भूमिकेत अमोल पाराशर. आम्ही ही मैत्री पडद्यावर निभावली आहे, मी खुश आहे.’ सरदार उधम सिंग, भगत सिंग यांच्या व्यतिमत्त्वापासून प्रभावित होते, जे स्वतंत्रच्या लढाईमध्ये ते त्यांची प्रेरणा बनले. सरदार उधम ही ब्रिटिश सरकारच्या जालियाबाला हत्याकांडच्या बदलाची कहानी आहे. चित्रपटात बनीता संधू एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विक्की कौशलचा सरदार उधम हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


हेही वाचा – Bigg Boss 15 घरात प्रवेश करताच सुरू झाला तांडव, Jay Bhanushali आणि Pratik Sehajpal यांच्यात राडा