Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनVicky Kaushal : चिमुकल्याची थिएटरमध्ये शिवगर्जना, Video पाहून विकी झाला भावुक

Vicky Kaushal : चिमुकल्याची थिएटरमध्ये शिवगर्जना, Video पाहून विकी झाला भावुक

Subscribe

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा सिनेमा शुक्रवारी 14 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दर्शवले आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेकर्सने केलेला प्रयत्न कुठेतरी सफल होताना दिसतोय. सध्या सर्वत्र छावाची चर्चा आहे. विविध वयोगटातून या सिनेमाविषयी भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, एका लहान मुलाचा थिएटरमध्ये शिवगर्जना करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विकीने पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती? हे जाणून घेऊया. (Vicky Kaushal shared video of little boy who got emotional after watching chhaava)

चिमुकल्याची शिवगर्जना

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते सांगता येणार नाही. पण या व्हिडिओत दिसणारा लहान मुलगा आणि त्याची शिवगर्जना सर्वत्र कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतेय इतकं नक्की. या व्हिडिओत एक लहान मुलगा दिसतोय. ‘छावा’ सिनेमा पाहून भावुक झालेला हा लहान मुलगा अत्यंत अभिमानाने थिएटरमध्ये छातीवर हात ठेवून शिवगर्जना करताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि मुखातून बाहेर पडणारी गर्जना महाराजांना मानवंदना देत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेता विकी कौशलने हा व्हिडीओ आपल्या हॅण्डलवर शेअर करत भावनिक कॅप्शन दिले आहे.

विकी कौशलची भावनिक प्रतिक्रिया

अभिनेता विकी कौशलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आमची सर्वांत मोठी कमाई. तुझा खूप अभिमान वाटतो आम्हाला बेटा. तुला मिठी मारावीशी वाटतेय. तुम्हा सर्वांच्या प्रेमाचे खूप खूप आभार. जगाच्या कानाकोपऱ्यात शंभूराजांची कथा पोहचावी हीच आमची ईच्छा! बाकी हे खरोखरचं सत्यात उतरताना पाहून अगदी जिंकल्यासारखं वाटतंय’.

‘छावा’ सिनेमाने रिलीजपासून अगदी 3 दिवसांतच 100 कोटींचा आकडा पार करत 121 कोटींची कमाई केली आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत खरोखरचं कौतुकास्पद आहे. तर इतर कलाकारांनी देखील जीव ओतून काम केले आहे आणि म्हणून सर्वत्र प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. येत्या काळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी चांगली कामगिरी करून रेकॉर्ड ब्रेक प्रदर्शन करेल अशी आशा आहे.

हेही पहा –

Prasad Oak Birthday : प्रसाद ओकच्या वाढदिवशी बायकोची हटके पोस्ट, म्हणाली – माझं लक्ष तुझ्यावरच