Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनVicky Kaushal : छावाच्या यशानंतर विकीने घेतलं बाबुलनाथाचे दर्शन

Vicky Kaushal : छावाच्या यशानंतर विकीने घेतलं बाबुलनाथाचे दर्शन

Subscribe

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाच्या रिलीजनंतर प्रेक्षकांना मिळालेला प्रतिसाद अगदी पाहण्यासारखा आहे. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दर्शवले आहे. सिनेमातील काही दृश्ये पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले. तर काहींचे हुंदके थांबायचं नाव घेत नव्हते. पहिल्या चार दिवसांतच छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. सिनेमाला मिळणारे यश पाहून अभिनेता विकी कौशल आता बाबुलनाथ मंदिरात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे समजत आहे. (Vicky Kaushal took the blessings of Babulnath after success of chhaava)

विकीने घेतलं बाबुलनाथाचे दर्शन

छावा सिनेमाच्या यशस्वी कामगिरीनंतर अभिनेता विकी कौशल बाबुलनाथ मंदिरात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. सोमवारी विकी कौशलने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात महादेवाची पूजा अर्चना करून सिनेमाच्या यशासाठी देवाचे आभार मानले. पूर्ण मनोभावे विशेष शिवपूजन करून त्याने देवाचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्याने मस्टर्ड कलरचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या उपस्थितीने आसपासच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि छावाची एक झलक पाहण्यासाठी मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

अभिनेता विकी कौशलने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिल्ने हे मी माझं भाग्य समजतो. हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण पात्र होते. एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अंगी खूप शिस्त लागते आणि हे फार अवघड असतं. ही केवळ एक महिन्याची मेहनत नसून 1.5 ते 2 वर्षांची बांधिलकी आहे. हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आणि अभिमान निर्माण करतोय याचा आम्हाला आनंद आहे’.

छावाची जबरदस्त कामगिरी

‘छावा’ सिनेमाने रिलीजनंतर केवळ 3 दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करून 140.50 कोटींचा आकडा गाठला आहे. विकेंडला तब्बल 72.4 कोटींची कमाई केल्यानंतर आता आगामी दिवसात सिनेमाच्या कमाईचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षात ‘छावा’ हा सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा ठरणार हे स्पष्ट दिसून येतंय.

हेही पहा –

Akshay Kelkar : ठरलं हो ठरलं, अक्षय केळकर या दिवशी अडकणार लग्नबंधनात