Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ' यांच्या बायोपिकमध्ये झळकणार विकी कौशल

‘फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार विकी कौशल

भारताचे आठवे लष्कर प्रमुख म्हणजे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयानं आणि फिटनेसनं चाहत्यांची नेहमी मनं जिंकतो. सोबतच त्याच्या प्रत्येक चित्रपटातील नवीन लूकने प्रेक्षकांना प्रभावित करत असतो. विकी कौशल आता त्याच्या एका नव्या कोऱ्या लूकसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटामध्ये तो लवकरच दिसणार आहे. या बायोपिकमध्ये विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे. विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचा टिझर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. मेघना गुलजार ‘सॅम बहादूर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी विकीचा पहिला लूक २०१९ मध्ये समोर आला होता. मात्र आता या चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 भारताने १९७१ च्या युध्दात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले आणि त्यांच्या ताब्यातील पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करुन बांगलादेशची निर्मिती केली. ही ऐतिहासिक घटना ज्यांच्या कारकिर्दीत घडली ते भारताचे आठवे लष्कर प्रमुख म्हणजे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना विकी कौशल म्हणाला की, ”मी सॅम यांच्याबद्दल माझ्या आई-वडिलांकडून लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण ज्यावेळी मी स्क्रीप्ट वाचली, तेव्हा मला कळलं की त्यांचं काम किती मोठं आहे आणि ते खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप महत्तवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”


- Advertisement -

हे वाचा- ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याचे नाव आले समोर

- Advertisement -