बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशल आणि कतरिना कैफची धाकटी बहिण इसाबेल कैफ यांना रविवारी पुन्हा एकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. इसाबेल कैफ आणि सनी कौशलची चांगली मैत्री असल्याचं अनेकदा दिसून येतं. अलीकडे सतत सनी इसाबेलसोबत स्पॉट होताना दिसतात.
कतरिनाच्या बहिणीसोबत सनी कौशल स्पॉट
View this post on Instagram
रविवारी रात्री विक्की कौशलचा भाऊ सनी कौशल आणि कतरिनाची बहीण इसाबेल कैफ मुंबईच्या बांद्रा येथे एकत्र स्पॉट झाले. यावेळी दोघांनी पापाराझींना पोझही दिली. यावेळी, इसाबेलने काळा शॉर्ट स्कर्ट आणि डेनिम टॉप घातला होता. तर, सनी कौशलने निळी डेनिम जीन्स आणि स्काय ब्लू शर्ट घातला होता.
सनी आणि इसाबेल करतायत एकमेकांना डेट?
सनी कौशल आणि इसाबेल पुन्हा एकत्र दिसताच त्यांच्या डेटिंगबद्दल अंदाज लावला जात आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की “ते डेटिंग करत आहेत का?” तर दुसऱ्याने, “काय चाललंय कैफ आणि कौशल.” असं लिहिलं आहे. तर तिसऱ्याने लिहिलंय की, “यांचे तर हम आपके है कौन? असं झालं आहे.”