Vicky Kaushal च्या बेधुंद डान्सचा कल्ला; चाहते म्हणतात, ”कतरिनाशी लग्न झाल्याचा”

नुकतंच विक्की आणि कॅटच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता विक्कीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बेधुंद डान्स करताना दिसत आहे. विक्कीच्या या डान्सवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Vicky Kaushal's dance goes viral on social media; Fans say,
Vicky Kaushal च्या बेधुंद डान्सचा कल्ला; चाहते म्हणतात, ''कतरिनाशी लग्न झाल्याचा''...

बॉलीवूडचा अभिनेता विक्की कौशल सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच विक्की आणि कॅटच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता विक्कीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बेधुंद डान्स करताना दिसत आहे. विक्कीच्या या डान्सवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.विक्कीने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विक्की धनुषच्या ‘मारी 2’ चित्रपटातील ‘रावडी बेबी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्याने- ‘व्हॉट मंडे ब्लूज’? अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विक्कीच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले – कतरिनाशी लग्न करून खूप आनंद झाला, तर दुसऱ्या यूजरने लिहिले – वहिनी काय व्हिडिओ बनवत आहे? अशा वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.

विक्की आणि कॅटचे ​​लग्न 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये झाले. तेव्हापासून हे जोडपे चर्चेत आहे. विक्की कौशल आणि कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विक्की सध्या ‘लुका छुपी 2’ मुळे चर्चेत आहे, तर कतरिना सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – Sara Ali khan ने सोडला नवाबी थाट, शेतात चालवला ट्रॅक्टर अन् बकऱ्याही चरवल्या