विक्की कौशलचा नवा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये विक्की त्याची पत्नी कतरिनासोबत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून विक्की-कतरिनाचे चाहते खूश झाले आहेत. दरम्यान, आता विक्कीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या काळात विक्की आणि अभिनेत्री भूमि पेडणेकरसोबत आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.

या महिन्यात प्रदर्शित होणार ‘गोविंदा नाम मेरा’

दिग्दर्शक शशांक खेतानचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता विक्की कौशल आणि भूमी पेडणेकरच्या या चित्रपटाची रिलीज डेट देखील शेअर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2022 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. परंतु अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा देण्यात आली नाही.

‘गोविंदा नाम मेरा’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार
‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटामध्ये विक्की कौशलसोबत भूमि पेडणेकर आणि कियारा अडवाणी देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसेल.

‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार विक्की कौशल
‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाव्यतिरिक्त विक्की कौशल येत्या काळात ‘सॅम बहाद्दूर’, ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.


हेही वाचा :

‘या’ दोन चित्रपटांमुळे कतरिनाच्या ‘फोन भूत’चे वाजले बारा; पहिल्या दिवशी कमावले अवघे इतके कोटी