घरमनोरंजनSardar Udham Singh : सरदार उधम सिंगमध्ये विकी कौशलच्या 'दुहेरी भूमिका'

Sardar Udham Singh : सरदार उधम सिंगमध्ये विकी कौशलच्या ‘दुहेरी भूमिका’

Subscribe

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा आगामी बहुचर्चित सरदार उधम सिंग चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट येत्या ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात तो स्वातंत्र्यसैनिक उधम सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित हा चित्रपट आहे. जालियनवाला बाग हत्याकांडावेळी शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मायकेल ओडॉयरची हत्या उधम सिंग यांनी केली होती. त्यामुळे उधम सिंग हे नाव आज भारताच्य़ा स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या नावांपैकी एक आहे.

जालियनवाला हत्याकांडाची घटना १९१९ मध्ये घडली, त्यावेळी उधम सिंग अवघ्या २१ वर्षांचे होते. यानंतर १९३४ साली म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी उधम सिंग यांनी जनरल ओडॉयरला मारण्यासाठी लंडन गाठले होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे १९४० साली त्यांनी अखेर जनरल ओडॉयरची हत्या केली.  यामुळे उधम सिंग यांची व्यक्तिरेषा हूबेहूब दिसण्यासाठी विकी कौशल या चित्रपटात  डबल  लूकमध्ये दिसणार आहे. अमृतसर प्रवासात विकी २१ वर्षीय उधम सिंग यांच्या भूमिकेत सडपातळ रुपात दिसणार आहे, तर १९४० मध्ये ४१ वर्षीय उधम यांच्या भूमिकेत तो थोडा वयस्कर दिसणार आहे.’

- Advertisement -

उधम सिंग यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी विकीने कठोर परिश्रम घेतले आहेत. अमृतसरच्या शेड्युलमध्ये तो लिक्विड डाएट फॉलो करत होता.  खाण्यात तो फक्त बिस्किट घेत होता. याचा परिणाम म्हणजे त्याचे कॉलर बोन दिसू लागले होते. गाल आणि डोळे खोल गेले होते. या दोन भूमिकांसाठी एकूणच विकीने १५ ते १६ किलो वजन कमी केले आणि नंतर ते पुन्हा वाढवले.


‘तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक’, एमी अवॉर्ड्स’ नामांकनाबद्दल नवाजुद्दीनला कंगनाने दिल्या शुभेच्छा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -