घरमनोरंजनविदर्भातील 'यश'च्या रुपात घडला ‘सुलतान शंभू सुभेदार’!

विदर्भातील ‘यश’च्या रुपात घडला ‘सुलतान शंभू सुभेदार’!

Subscribe

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार सत्य घटनेवर आधारीत 'सुलतान शंभू सुभेदार' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विदर्भातील सत्य घटनेवर आधारित असलेला यश असोसिएट मुव्हीज यांच्या सुलतान शंभू सुभेदार लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. डॉ. राज माने यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून कैलास गिरोळकर आणि अॅड. प्रशांत भेलांडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच ह्या चित्रपटाची कथा आणि गाणी अॅड. प्रशांत भेलांडे यांनी लिहिली आहेत. या गाण्यांना धनश्री देशपांडे, डॉ. डहाणे आणि श्रीरंग भाले यांनी स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे नाव आणि त्याच्या माध्यमातून पदार्पण करणारा बालकलाकार यश गिरोळकर हे चित्रपटाचे खास आकर्षण ठरणार आहे.

मूळचा अमरावतीचा असलेल्या १४ वर्षांच्या यशला लहानपणापासूनच गाण्याची, नाचण्याची आणि अभिनयाची आवड आहे. इतकंच नव्हे तर यश हार्मोनियम, सितार आणि कॅसियो ही वाद्यदेखील उत्तमरित्या वाजवतो. त्याबरोबर तो अमरावतीतील फॅशन शो चा विजेताही राहिला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालनाट्य पुरस्कार देखील पटकावला असून त्याने ‘सोबती’ नावाची शॉर्टफिल्म देखील केली आह. तसेच भट्टी, झाडं यांसारखी नाटकं देखील केली आहेत. विविध कलाक्षेत्रात जबरदस्त पकड बसवलेला हा पठठ्या केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण विदर्भात खूपच प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत व्यक्ती, राजकारणी यांच्यामध्ये यशने स्वत:शी अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाळेमधील स्पर्धांमध्ये केवळ सहभागी न होता शाळेतील अनेक कार्यक्रमांचे तो स्वत: आयोजन करत असल्यामुळे सर्वांचाच तो लाडका आहे.

- Advertisement -

विविध कलागुण अवगत असलेल्या यशने ‘सुलतान शंभू सुभेदार’ ही भूमिका साकारताना घेतलेली मेहनत ही तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेलच. तसेच ह्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी त्याने झोपडपट्टी वस्तीत जाणून तेथील लोकांचा, त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास केला. ह्यात त्याला त्याचे वडिल त्याचबरोबर या सिनेमाचे निर्माते कैलास गिरोळकर यांची खूप मदत झाली. तसेच वयाने लहान असल्यामुळे शूटिंगदरम्यान त्याला खाण्याच्या बाबतीत काही नावडत्या गोष्टींना सामोरे जावे लागले. अभिनयाची आवड असल्यामुळे ऑफसेटही हा पठ्ठ्या सहकलाकारांची मिमिक्री करणे, त्यांची खोड काढणे अशा अनेक गंमतीदार गोष्टीही करत होता. पण हे सर्व आपण खूप एन्जॉय केल्याचं यश गिरोळकर सांगतोय. तसेच अजून मेहनत करुन अभिनय क्षेत्रात पुढे करिअर करण्याचा आपला विचार असल्याचंही त्याने सांगितल आहे.

वाचा : हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारीत ‘सुलतान शंभू सुभेदार’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -