Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Video: प्रियंका परिणीतीच्या Rain Dance वर फॅन्सीनी दिली मजेशीर प्रतिक्रिया

Video: प्रियंका परिणीतीच्या Rain Dance वर फॅन्सीनी दिली मजेशीर प्रतिक्रिया

अभिनेत्री पियंका चोप्रा लवकरच अँमेझॉन प्राइमवरील 'सिटाडेल' या शोमध्ये दिसणार

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडच्या मोस्ट फेव्हरेट अभिनेत्रीपैंकी अभिनेत्री म्हणजेच प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) आणि परिणीती चोप्रा (Parineeti chopra) दोघीही सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असतात. बॉलिवूडच्या या दोन्ही बहिणींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघीही पावसाचा मनमुराद आनंद घेत ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. काल पाऊस पडताच दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ थ्रोबॅक व्हिडिओ म्हणून शेअर करण्यात आला आहे. दोघींच्या पावसाळ्यातील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. (Video: Funny reaction to bolltwood actress Priyanka chopra and Parineeti chopra’s Rain Dance video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

- Advertisement -

सध्या परिणीती चोप्रा तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दोघी बहिणांचा हा धम्माल व्हिडिओ पाहून त्यांच्या फॅन्सलाही रहावले नाही. प्रियंका आणि परिणीतीच्या यांच्या Rain Dance व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तर अनेक कमेंट ही केल्या आहेत. ‘दोन्ही बहिणी सुंदर आहेत’, असे म्हणत अनेकांनी दोघींचे कौतुक केलेय तर एका फॅनने खूपच मजेशीर प्रतिक्रिया आहे. टिप टिप बरसा गाण्यावरचा Rain Dance पाहून ‘दिदीला साबण हवा आहे’,अशी कमेंट एका फॅन केलीय. या कमेंटवर अनेक रिअँक्शन आल्या आहेत. हा व्हिडिओही सध्या तुफान व्हायरल होत आहे.

दोघी बहिणी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पावसाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. अभिनेत्री पियंका चोप्रा लवकरच अँमेझॉन प्राइमवरील ‘सिटाडेल’ या शोमध्ये रिचर्ड मॅडमच्या भूमिकेत प्रियंका दिसणार आहे. तर अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच अभिनेता रणबीर कपूर सोबत ‘अँनिमल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – आशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा दिली तेजश्रीने प्रतिक्रिया; म्हणाली, आमच्यात…

 

- Advertisement -