Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अखेर सापडला! गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणारा अटकेत

अखेर सापडला! गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणारा अटकेत

Subscribe

गौतमी पाटील हिने पोलिसांत तक्रार केली होती. आता पोलिसांना यात मोठं यश आलं आहे. गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील (Gautamin Patil) गेल्या सहा महिन्यांपासून कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहे. राज्यभरात तिच्या या व्हिडीओची चर्चा आहे. या व्हिडीओबाबत गौतमी पाटील हिने पोलिसांत तक्रार केली होती. आता पोलिसांना यात मोठं यश आलं आहे. गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ( Video of Gautami Patil changing clothes went viral the accused arrested by Pune Police  )

गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. गौतमीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अनेक मंडळी तिच्या पाठिशी उभे राहिले. राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

गौतमी पाटीलचा 24 फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला. त्यानंतर गौतमी पाटीलसोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मागच्या काही दिवसांपासून पोलीस या प्रकरणी तपास करत होते.

( हेही वाचा: ‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत अभिनेत्री उषा नाईक भद्राक्काच्या भूमिकेत )

- Advertisement -

अशा घटना वारंवार घडू नये. सोबतच्या इतर कोणत्याही कालाकाराबाबत असा प्रकार घडू नये म्हणून गौतमीने व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॅनिटी व्ह‌‌‌‌ॅनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतात. शिवाय कलाकारांसाठी ही व्ह‌ॅन अत्यंत सुरक्षित असते. मराठी सिनेसृष्टीपासून ते बाॅलिवूडपर्यंतचे कलाकार या व्ह‌‌ॅनिटी व्ह‌‌ॅनचा वापर करतात. जिथे जिथे ती कार्यक्रमाला जाते तिथे ती व्ह‌ॅनिटी व्हॅनची मागणी करते. तसंच संरक्षणासाठी तिने बाऊन्सरही ठेवले आहेत.

( हेही वाचा: शीझानला मिळणार पासपोर्ट; वसई कोर्टाने अर्ज केला मंजूर )

तसचं, गौतमी पाटील आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप वारंवार होत असतानाही त्याचा तिच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही. गौतमीचा घुंगरू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

- Advertisment -