घरमनोरंजनVideo:शिल्पा शिंदेचा अॅक्टिंगला फूलस्टॉप,अभिनय सोडून करतेय बांधकाम क्षेत्रात काम!

Video:शिल्पा शिंदेचा अॅक्टिंगला फूलस्टॉप,अभिनय सोडून करतेय बांधकाम क्षेत्रात काम!

Subscribe

मोठ्या मेहनतीने ती ड्रिलिंग मशीनच्या मदतीने खोद काम करताना दिसतेय. व्हिडिओ शेअर करत शिल्पा ने एक महत्वपूर्ण मेसेज चाहत्यांना दिला आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आपल्या अभिनयाच्या बळावर छोट्या पडद्यावर अंगुरी भाभी हे पात्र उत्तमरित्या रंगवलं चाहत्यांची तिच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यानंतर बिग बॉस या रियालिटी शो मधून शिल्पाची खरी ओळख प्रेक्षकांना झाली. आपल्या फॅन्सची मनं जिंकत शिल्पाने बिग बॉसची ट्रॉफी पटकावली. शिल्पा लाईम लाईट पासून दूर राहणे पसंत करते. मात्र सध्या शिल्पा एका व्हिडिओ मुळे भारीच चर्चेत आली आहे. शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओ मध्ये?

शिल्पा एका कन्स्ट्रक्शन साइटवर काम करत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसून येतय. लॉकडाऊनमुळे शिल्पावर ही वेळ आली आल्याचं तिने म्हंटलं आहे. व्हिडीओत शिल्पाने डोक्यावर कॅप घातली आहे. तरा हातात मोठं ड्रिलिंग मशीन घेऊन ती काम करतेय. मोठ्या मेहनतीने ती ड्रिलिंग मशीनच्या मदतीने खोद काम करताना दिसतेय.
व्हिडिओ शेअर करत शिल्पा ने एक महत्वपूर्ण मेसेज चाहत्यांना दिला आहे. “ज्यांच्याकडे आता काम नाही ते आपलं क्षेत्र बदलू शकतात. काळानुसार सर्व काही ठीक होईल. फक्त पॉझिटिव्ह रहा.” असं शिल्पा म्हणाली. शिल्पाच्या या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे.

- Advertisement -

शिल्पा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. शिल्पाने आपल्या अभिनयाची सुरुवात 1999 मधून केली होती. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेनंतर शिल्पाला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस या शो मधून.

- Advertisement -

हे हि वाचा – अक्षय कुमारचा सिनेमा ‘पृथ्वीराज’वादाच्या भोवर्‍यात,करणी सेनेने दर्शवला विरोध!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -