कृति सेनन आणि राजकुमार रावच्या ‘हम दो हमारे दो’ चा दमदार ट्रेलर आउट

video trailer release of kriti sanon and raj kumar rao starrer hum do hamare do
कृति सेनन आणि राजकुमार रावच्या ‘हम दो हमारे दो’ चा दमदार ट्रेलर आउट

बॉलिवूड अभिनेते राज कुमार राव आणि कृति सेनन ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अशातच या दोघांचा ‘हम दो हमारे दो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणात पसंती मिळत आहे. धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांना चित्रपटाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

या चित्रपटात राजकुमार राव आणि कृति सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ‘कभी आर कभी पार’ या बॅकग्राउंड म्युझिकने होते. तर राजकुमार रावच्या आवाजात तो ‘हम दो हमारे दो परफेक्ट फॅमिली असते’ असं म्हणत माझी स्टोरी थोडी उलटी असल्याचे सांगत यावेळी राजकुमार राव आणि कृति सेनन एका गाडीवरुन जात निघून जातात. या चित्रपटात राजकुमार एका मुलाची भूमिका साकारत असतो. जो त्याच्या गर्लफ्रेंडसह लग्न करण्यासाठी नकली आई-वडील शोधत असतो. यात गर्लफ्रेंडची भूमिका कृति सेनन साकारत आहे.

त्याचवेळी, परेश रावल आणि रत्ना पाठक शाह यांची ट्रेलरमध्ये “पापा” आणि “मम्मी” म्हणून एन्ट्री होते. ज्यामुळे ट्रेलर अधिक मजेदार वाटतोय. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ट्रेलर पाहून चाहते हसून लोटपोट होत आहेत. या ट्रेलरमध्ये कृति आणि राजकुमारच्या लव्हस्टोरीसह एक कॉमेडीचा तडका देखील पाहायला मिळतोय.

राजकुमार राव आणि कृती सेनन दोघांनी या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘यंदाची दिवाळी फॅमिलीवाली! सादर करत आहोत #HumDoHamareDo स्ट्रीमिंगचा टीझर लवकरच @disneyplushotstar #DisneyPlusHotstarMultiplex “वर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे २९ ऑक्टोबरला रोजी डिज्नी + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा अभिषेक जैन, प्रशांत झा आणि अभिजीत खुमान यांनी लिहिली आहे. याच कृति सेनन, राजकुमार रावसह परेश रावल, रत्ना पाठक आणि अपारशक्ती खुराना यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.


Amitabh Bachchan बिग बींनी आई ‘तेजी बच्चन’ यांच्याबरोबर केला होता नाटकात अभिनय