घरताज्या घडामोडीVideo : ‘पास नहीं तो फेल नहीं’ शकुंतला देवी चित्रपटातील पहिलं गाणं...

Video : ‘पास नहीं तो फेल नहीं’ शकुंतला देवी चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित!

Subscribe

बॉलिवूडमधील प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवीं यांच्यावर हा बायोपिक आहे. नुकताच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘पास नहीं तो फेल नहीं’ हे पहिलंवहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात विद्या पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. वर्गात बसून गणित किती सोपं आहे हे विद्या या गाण्यातून विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

शकुंतला देवी चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित करताना मनस्वी आनंद होत आहे. पास नहीं तो फेल नहीं हे गाणं खरच मला फार आवडलं आहे, ते माझ्या अतिशय जवळ जाणारं आहे. आकड्यांसोबत संवाद साधण्याची एक मजेशीर पद्धत या गाण्यातून समोर आणण्यात आली आहे. गणित या विषयाचा फोबिया दूर करण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. हा खूपच गमतीशीर पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. मुलांसोबत हे व्हर्चुअल सेशन करताना आणि त्यांच्यासोबत हा मंच शेयर करताना खूप आनंद आला. हा एक वेगळा परंतु चांगला अनुभव होता”, असं विद्या या गाण्याविषयी बोलताना म्हणाली. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.


हे ही वाचा – बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून अनुराग कश्यप-रणवीर शौरीमध्ये ट्विटर वॉर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -