‘भूल भुलैया २’मध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसणार मोंजोलिकाच्या रूपात

'भूल भुलैया २'मध्ये कार्तिक आर्यन, तबू आणि कियारा आडवाणी याचे नाव निश्चित झाले आहे. या चित्रपटातील कार्तिकचा लूक खूप व्हायरल झाला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे मोंजोलिका आहे.

Vidya Balan returning as Monjulika in Bhool Bhulaiyaa 2
'भूल भुलैया २'मध्ये 'ही' अभिनेत्री दिसणार मोंजोलिकाच्या रूपात

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा हिट चित्रपट ‘भूल भुलैया’चा पुढील पार्ट नव्या कास्टसोबत येण्यास तयार झाला आहे. ‘भूल भुलैया २’मध्ये कार्तिक आर्यन, तबू आणि कियारा आडवाणी याचे नाव निश्चित झाले आहे. या चित्रपटातील कार्तिकचा लूक खूप व्हायरल झाला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे मोंजोलिका आहे. ‘भूल भुलैया’मध्ये मोंजोलिकाची व्यक्तिरेखा विद्या बालनने साकारली होती. पण आता ‘भूल भुलैया २’मध्ये ही लोकप्रिय व्यक्तिरेखा कोण साकारणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ‘भूल भुलैया २’ चित्रपटात मोंजोलिकाची व्यक्तिरेखा विद्या बालन साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही शक्यता नाकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया २’मध्ये विद्या बालन मोजोंलिकाच्या रुपात दिसणार आहे , मिड-डेने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. माहितीनुसार, जेव्हा विद्याने अनील बज्मीच्या थँक्यू चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती, तेव्हापासून विद्या अनिल बज्मी यांच्यासोबत काम करत आहे. विद्या बालनने केलेले राजेशाही नर्तिकेचे भूत मोंजोलिकाचे पात्र अविस्मरणीय आहे. आता विद्या बालन पुन्हा एकदा भुल भुलैया २ मध्ये दिसणार का? आणि ‘आमी जे तोमार’  गाण्यावर डान्स करणार की क्लायमॅक्समध्ये दिसणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेल.

२००७ साली ‘भूल भुलैया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. या चित्रपटात विद्या बालन, अक्षय कुमार व्यतिरिक्त अमिषा पटेल आणि शाइनी आहूजा प्रमुख भूमिकेत होती. हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रक्षेकांच्या खूप पसंतीस उतरला होता. आता ‘भूल भुलैया २’मध्ये अनीज बज्मी काय कमाल करतात? हे येत्या काळात समजेल.


हेही वाचा – Majha Hoshil Na: माझा होशील ना २ प्रेक्षकांच्या भेटीला? गौतमीच्या पोस्टची चर्चा, म्हणाली…