Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन विद्युत जामवालने 'कमांडो' स्टाईलने नंदिता महतानीसोबत केला साखरपुडा

विद्युत जामवालने ‘कमांडो’ स्टाईलने नंदिता महतानीसोबत केला साखरपुडा

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडचा अँशन हिरो आणि ‘कमांडो बॉय’ विद्युत जामवाल यानं फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला आहे. विद्युत जामवाल याने इंस्टाग्राम पोस्ट करत साखरपुडा केल्याची घोषणा केली. मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल आणि नंदिताच्य़ा साखरपुड्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र विद्युतने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट करत या चर्चेंना पूर्णविराम दिला आहे. विद्युत जामवालने गर्लफ्रेंड आणि होणाऱ्या बायको नंदितासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये विद्युत अगदी कमांडो स्टाईलमध्ये दिसतोय. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये दोघे ताजमहलासमोर रोमँटिक अंदाजात उभे असल्याचे दिसतायत. विद्युतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, कमांडो स्टाइलमध्ये साखरपूडा केला.01/09/21.’

- Advertisement -

सैनिकी कुटुंबाशी संबंधित असलेल्या विद्युत जामवालने खास रोमँटिक अंदाजात प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोघेही आग्राजवळील एका लष्करी छावणीत पोहोचले आणि तेथे दोघेही १५० मीटर लांब भिंतीवरून रॅपेलिंग करत खाली उतरत असताना एकमेकांना अंगठी घातली.नंदितानेही विद्युतसोबतचा एक फोटो पोस्ट करत साखरपुड्याची अधिकृत कबुली दिली आहे. विद्युतसोबतचा फोटो पोस्ट करत नंदिताने लिहिले की, ‘तुझ्यासोबत अजून मी लटकून राहू शकत नाही.. प्लीज हा बोल…’ नंदिता आणि विद्युत यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही दोघांचे अभिनंदन केले आहे.

विद्युत आणि नंदिनी यांना ताजमहल येथे स्पॉट करण्यात आले. यावेळचे काही फोटो पाहून दोघांना साखरपुडा केल्याचा चर्चा रंगू लागल्या. त्य़ावेळी अभिनेत्री नेहा धुपियानंही दोघांचे अभिनंदन करत लिहिले की, आत्तापर्यंतची सर्वात गोड बातमी. जी मला आता समजली आहे. दोघांनाही शुभेच्छा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nandita Mahtani (@nanditamahtani)

- Advertisement -

४५ वर्षीय नंदिता मेहतानी ही बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते. डिनो मोरियासह ती प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवते. दरम्यानच्या काही काळात तिने क्रिकेटपटू विराट कोहलीच्या स्टाईलिंगचे काम देखील पाहिले. तर आत्तापर्यंत तिने अनेक बड्या सेलिब्रिटींसाठी फॅशन डिझायनर म्हणून पाहिले. विद्युतबद्दल बोलायचे झाले त्याला बॉलिवूडमध्ये अँशन हिरो म्हणून ओळखले जाते. कमांडो चित्रपटामुळे तो अधिकचं प्रसिद्धी झोतात आला.

याशिवाय तो खुदा हाफिज, जंगली, यारा, फोर्स या चित्रपटांमध्ये दिसला आहे. लवकरचं तो सनक या चित्रपटात दिसणार आहे. जम्मूमध्ये जन्मलेला विद्युत जामवाल हा केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर एक उत्कृष्ठ मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट परफॉर्मर देखील आहे. त्याने बॉलिवूडसह टॉलीवुड आणि कॉलीवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विद्युत जामवालचे तुम्हे दिल्लगी आणि गल बन गई ही दोन गाणीही प्रचंड हिट झाली.


Viral Video : रिव्हॉल्व्हरसह इन्स्टाग्राम रील करणं महिला कॉन्स्टेबलला पडलं भारी, द्यावा लागला राजीनामा


 

- Advertisement -