Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन विद्युत जामवालने नंदितासोबत उरकला साखरपुडा,लवकरच अडकणार विवाह बंधनात

विद्युत जामवालने नंदितासोबत उरकला साखरपुडा,लवकरच अडकणार विवाह बंधनात

नंदिता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक लोकप्रिय बॉलिवूड स्टार सोबत काम केल आहे. नंदिता करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरची पहिली पत्नी असून नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर संजयने करिश्माशी लग्न केले होते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)सिनेमांतून आपल्या अ‍ॅक्शन आणि अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल(vidyut jamwal). बॉलिवूडमधील एक अ‍ॅक्शन हिरो (Action hero)म्हणून विद्युत जामवालाला ओळखले जाते. फोर्स, कमांडो, जंगली यांसारख्या अनेक सिनेमांतून विद्युतचे जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंट पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विद्युतच्या आजपर्यंत चित्रपटांमध्ये चित्रित झालेले सर्व स्टंट विद्युत जामवाला स्वत:च केले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत विद्युत जामवालने एक अ‍ॅक्शन हिरो म्हणून मोठी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर विद्युत प्रचंड सक्रिय असून आपल्या व्यावसायिक तसेच व्यक्तीगत जीवनातील अनेक घडामोडी तो चाहत्यांसबत शेअर करत असतो. सध्या सोशल मीडियावर विद्युतचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विद्युत फॅशन डिझाइनर नंदिता मेहतानी(nandita mehtani) सोबत ताजमहाल (Tajmahal)येथे फिरत असताना एक फोटो व्हायरल होत आहे. तसेच विद्युत आणि नंदिताने साखरपुडा केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दोघांनी गपचुप साखरपुडा उरकल्याची बातमी अभिनेत्री नेहा धूपियाने (neha dhupia)कन्फर्म केली आहे.(vidyut jamwal and nandita mhatanis engagement )

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तनुसार , तीन दिवसांपूर्वीच विद्युत आणि नंदिताचा साखरपुडा झाला आहे. आणि नेहाने दोघांनाही साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ताजमहालसमोर काढलेल्या फोटोत विद्युतने नंदिताचा हात पकडला आहे दरम्यान नंदिताच्या हातात एक सुंदर हिऱ्याची अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.गेल्या पाच महिन्यापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे कळतेय तसेच लवकरच हे कपल विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Singu_is_life (@its_kanchu)

- Advertisement -

नंदिता महतानी बदद्ल सांगायचे झाल्यास नंदिता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक लोकप्रिय बॉलिवूड स्टार सोबत काम केल आहे. नंदिता करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरची पहिली पत्नी असून नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर संजयने करिश्माशी लग्न केले होते. तसेच यानंतर नंदिताचे नाव अभिनेता डिनो मोरियासोबतही जोडले गेले होते. मात्र व्यक्तीगत कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता.


- Advertisement -

हे हि वाचा – दैव देते आणि कर्म नेते;रानू मंडलचा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

- Advertisement -