Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन विजय आंदळकर पुन्हा अडकणार लग्न बंधनात, रिल लाईफमधील बायकोसोबतच उरकला साखरपुडा

विजय आंदळकर पुन्हा अडकणार लग्न बंधनात, रिल लाईफमधील बायकोसोबतच उरकला साखरपुडा

रुपालीने सोशल मीडियाद्वारे साखरपुड्याचे फोटो शेअर कर ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे.

Related Story

- Advertisement -

लोकप्रिय मालिका ‘लग्नाची वाइफ वेडिंगची बायकू’ ही मालिका अजून ही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेतील मदन, काजोल आणि मारिया ही पात्रे चांगलीच गाजली होती. मालिकेतील मदन म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि काजोल म्हणजेच अभिनेत्री रुपाली झंकार आता रिलच नाहीतर रिअल लाईफमध्येही कपल झाले आहेत. या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आहे. रुपालीने सोशल मीडियाद्वारे साखरपुड्याचे फोटो शेअर कर ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. अॅन्गेजमेन्ट डन असे कॅप्शन देत रुपालीने साखरपुड्याचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोजवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ROOP✨ (@rupalizankar)

विजय हा अभिनेत्यासोबतच वकिलदेखील आहे. विजयचे पहिले लग्न पुजा पुरंदरेशी झाले होते. पण त्यांचा संसार फार काळ चिकला नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पूजा सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. विजयने मिस्टर अॅंड मिसेस सदाचारी, ढोल ताशे, ७०२ दिक्षित या चित्रपचांमध्ये काम केले आहे.


- Advertisement -

हे वाचा- कपूर घराण्यात संपत्तीवरुन वाद, राजीव कपूरयांच्या संपत्तीसाठी रणधीर-रिमाची कोर्टात याचिका दाखल

- Advertisement -