KGF 2-Beast Clash : थलापती विजयचा ‘बीस्ट’ अन् यशचा ‘केजीएफ 2’ होणार क्लॅश, कोण मारणार बाजी ?

अभिनेता यश (yash) आणि विजय (Thalapathy vijay) हे दोघेही साऊथचे सुपरस्टार आहेत. दोघांची जबरदस्त फॅन फॉलोव्हींग आहे. दोघांचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. दोन आवडत्या साऊथ कलाकारांचे, सुपरहीट सिनेमे एकाच वेळी रिलीज होत असल्याने साऊथ प्रेक्षकांसाठी ही परवणी ठरणार आहे.

vijay beast Movie release date box office clash with yash kgf 2
KGF 2-Beast Clash : थलापती विजयचा 'बीस्ट' अन् यशचा 'केजीएफ 2' होणार क्लॅश, कोण मारणार बाजी ?

KGF 2-Beast Clash : बॉक्स ऑफिसवर सिनेमे क्लॅश होणे सामान्य बाब आहे. परंतु जेव्हा दोन तगडे सिनेमे आणि तगडे कलाकार एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा क्लॅश होणाऱ्या सिनेमांची रंगत आणखी वाढते. यावेळी दोन साऊथ सुपरस्टार एकमेकांसमोर आले आहे. हे सुपरस्टार आहेत अभिनेता यश (yash)  आणि थलापती विजय ( Thalapathy
vijay) दोघांचे सिनेमे एकामागोमाग रिलीज होत आहेत. विजयचा “बीस्ट” (Beast ) हा सिनेमा १३ एप्रिलला रिलीज होणार आहे.सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकतीच सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केलीय.  तर अभिनेता यशचा “केजीएफ २” (KGF 2)  एक दिवसानंतर म्हणजेच १४ एप्रिलला रिलीज होणार आहे. दोन्ही सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमे आता काय रंगत आणणार आणि कोणता सिनेमा बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिनेता यश आणि विजय हे दोघेही साऊथचे सुपरस्टार आहेत. दोघांची जबरदस्त फॅन फॉलोव्हींग आहे. दोघांचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. दोन आवडत्या साऊथ कलाकारांचे, सुपरहीट सिनेमे एकाच वेळी रिलीज होत असल्याने साऊथ प्रेक्षकांसाठी ही परवणी ठरणार आहे.

बॉलिवूड सिनेमांचा विचार केला तर या साऊथ सिनेमांसोबत बॉलिवूडचेही बहुप्रतिक्षीत सिनेमेही आमने-सामने येणार आहे. अभिनेता शाहीद कपूरचा “जर्सी” हा सिनेमा १४ एप्रिलला रिलीज होणार आहे.  तसेच अभिनेता आमिर खानचा लाल सिंह चड्डा ही १४ एप्रिलला रिलीज होणार होता परंतु सिनेमाची रिलीड डेट काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. लाल सिंह चड्डा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे.

अभिनेता यशच्या केजीएफ २ सिनेमाविषयी बोलायला गेलं तर, सिनेमा यश सोबत अभिनेत्री रवीना टंडण आणि संजय दत्त हे बॉलिवूड कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. त्याचप्रमाणे श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राजही सिनेमात दिसणार आहे. सिनेमाची केजीएफ १ तगड्या सक्सेसनंतर केजीएफ २ पाहण्यासाठी प्रेक्षकही फार उत्साही आहेत.

तसेच थलापती विजयच्या बीस्ट या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर सिनेमा विजय सोबत अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत असणार आहे. सिनेमात विजयचा ढासू लूक समोर आला आहे. सिनेमातील Arebic Kuthu हे गाणं सध्या चांगलच व्हायरल होत आहे. सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर धमाका करेल सर्वांना अपेक्षा आहे.


हेही वाचा – Sarkaru Vaari Paata : महेश बाबूच्या मुलीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण