घरमनोरंजनविनोदवीर विजय चव्हाण अनंतात विलीन

विनोदवीर विजय चव्हाण अनंतात विलीन

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज सकाळी त्यांनी फोर्टीस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने एक खळखळून हसवणारा एक अभिनेता हरपला अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

हरहुन्नरी कलाकार, प्रेमळ आणि वक्तशीर अशी ओळख असलेले विनोदवीर ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोड्याचवेळापूर्वी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यंदा त्यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली असून  त्यांच्या अंतदर्शनासाठी आलेल्या  कलाकारांनी विनोदवीर चव्हाणांच्या अनेक आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

‘टुरटुर’पासून करिअरची सुरुवात

टुरटुर या तुफान लोकप्रिय नाटकाने विजय चव्हाण यांनी आपल्या करिअरची सुरवात केली आणि त्यानंतर पुढे अनेक वर्ष अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. मात्र सुयोग संस्थेच्या मोरूची मावशी या नाटकातील त्यांच्या इरसाल भूमिकेमूळे त्यांना खरी ओळख मिळाली. या नाटकाचे सुमारे २००० प्रयोग झाले. या नाटकातील टांग टिंग टिंगा या गाण्यावरील त्यांचे नृत्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. विनोदी असो वा चरित्र भूमिका विजय चव्हाण यांनी आपली प्रत्येक भूमिका समरसून केली. माहेरची साडी, येऊ का घरात, जत्रा,थरथराट, अशी असावी सासू ,घोळात घोळ,आली लहर केला कहर असे त्यांचे गाजलेले मराठी सिनेमे . हयवदन,टुरटुर,मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत ही त्यांची काही गाजलेली नाटकं होती. रानफूल,लाइफ मेंबर या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या होत्या.

- Advertisement -

 मोरुची मावशी म्हणजे विजय चव्हाण

मोरुची मावशी या नाटकातली विजय चव्हाण यांची मावशीची भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या नाटकातील टांग टिंग टिंगा हे गाणं तर तुफान गाजलं.

- Advertisement -

(सौजन्य- युट्युब)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -