Video: अर्जुन रेड्डी पडता पडता वाचला!

vijay devarakonda leg slip while walking video viral on social media
Video: अर्जुन रेड्डी पडता पडता वाचला!

तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या वेगळ्या अंदाजामुळे तो जास्त ओळखला जातो. पण नुकताच त्याच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विजय पाय घसरल्यामुळे पडता पडता वाचला असल्याच दिसत आहे. यावेळेस त्याच्यासोबत बरेच लोक होती. या व्हिडिओमुळे विजय देवरकोंडा चर्चेत आला असून त्याच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. विजय देवरकोंडाचा हा व्हिडिओ वंपूलाने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहेत. या व्हिडिओने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विजय देवरकोंडा आपल्या बॉडीगार्ड आणि बाकीच्या लोकांसोबत चालत होता. मात्र त्यादरम्यान अचानक त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो पडता पडता वाचला. त्याच्या मागे असलेल्या लोकांनी त्याला पडण्यापासून वाचलं. अभिनेता विजय देवरकोंडा हा ‘अर्जुन रेंड्डी’ या तेलगू चित्रपटातून चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याच्या या चित्रपटाचा रिमेक बॉलिवूड मध्ये केला. ‘कबीर सिंग’ असं या बॉलिवूड चित्रपटाचं नाव असून त्यामध्ये अभिनेता शाहिद कपूरने प्रमुख भूमिका साकारली होती. ज्याप्रमाणे तेलगू चित्रपटसृष्टीत ‘अर्जुन रेट्टी’ला लोकप्रियता मिळाली त्याप्रमाणे ‘कबीर सिंग’ला देखील बॉलिवूडमध्ये मिळाली.

सध्या तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा हा ‘फाइटर’ या चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विजय या चित्रपटात बॉक्सरची भूमिका करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी त्याने बॉक्सिंगचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. हा चित्रपट तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा विजय आणि अनन्या एकत्र दिसणार आहेत.


हेही वाचा – सलमान सांगतोय..करोनाशी कसे करा दोन हात!