विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या ‘लायगर’ चित्रपटाचं ट्रेलर रिलीज

'लायगर' चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला जात आहे. तर अनन्या पांडे या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

साउथ अभिनेता विजय देवरकोंडाने आता बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. येत्या काळात विजय देवरकोंडा ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबतच अभिनेत्री अनन्या पांडे सुद्धा दिसून येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

रिलीज करण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडा जबरदस्त अॅक्शन करताना दिसून येत आहे. त्यांने आपल्या किकबॉक्सिंगने सर्वांना वेड लावलेले आहे. चित्रपटामध्ये राम्या कृष्षन ही अभिनेत्री विजयच्या आईची भूमिका साकारणार आहे. तसेच या ट्रेलरमध्ये अनन्या आणि विजयचा रोमांस सुद्धा पाहायला मिळत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच काहीजण या ट्रेलरचं कौतुक देखील करत आहेत.

विजय देवरकोंडाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘लायगर’ चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला जात आहे. तर अनन्या पांडे या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. लायगर पॅन इंडिया चित्रपट आहे ज्याची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये अमेरिकेचा बॉक्सर माइक टाइसन सुद्धा दिसून येणार आहे. लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन टॉलिवूडचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी केले आहे.

ट्रेलरचं होतय भरभरून कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या लायगर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहचे खूप खूश झाले आहेत. विजयची अॅक्शन पाहून सगळेच त्याचे दिवाने झाले आहेत. २०२१ मध्ये या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली होती.२५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :‘पुष्पा पार्ट २’ मध्ये ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री…