बहुचर्चित ‘लायगर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने शेअर केलेल्या विजय देवरकोंडाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

'लायगर'(Liger) या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा(vijay devrakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे(ananya pandey) हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (vijay devrakonda) याचा बहुचर्चित ‘लायगर’ (Liger)ह्या चित्रपटातला एक जबरदस्त लुक रिलीज करण्यात आला आहे. निर्माता कारण जोहर (karan johar) आणि अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे पोस्टर शेअर करत पात्राची माहिती दिली आहे. याच पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 

आणखी वाचा –  प्रियंका चोप्राचा अमेरिकेत नवा व्यवसाय, ‘सोना होम’मधील वस्तूंच्या किमतीची सोशल मीडियावर चर्चा

 

आणखी वाचा –  डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने चाहत्यांना दिली “डॉक्टर जी” ची खास भेट

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

 

‘लायगर'(Liger) या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा(vijay devrakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे(ananya pandey) हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. पण या चित्रपटाचे जे पोस्टर समोर आले आहे त्यामुळे ते या चित्रपटाच्या कथानकाला ट्विस्ट्स देणारे आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याचे यापूर्वी सुद्धा प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील अनेक नामवंत कलाकारांच्या यादीत विजय देवरकोंडा याचं नाव घेतलं जातं.

 

आणखी वाचा – आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या ‘या’ वर्कआऊट टिप्स फॉलो करत रहा फिट

 

आणखी वाचा –  “हा तर वडापाव सारखा”……अल्लू अर्जुनचं वाढलेले वजन पाहून युजर्सने केलं ट्रोल

 

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेता विजय देवरकोंडा(vijay devrakonda) हा न्यूड उभा असलेला दिसत आहे. त्याचबरोबर या पोस्टर मध्ये विजय ने हातात गुलाबाचा पुष्पगुछ धरला आहे. करण जोहरने हे पोस्टरचा शेअर करताना एक हटके कॅप्शन सुद्धा दिले आहे. ‘रोज रोज ऐसे गिफ्ट नाही मिलते’ असं कॅप्शन सुद्धा करण जोहरने दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे(ananya pandey) यांच्या मुख्य भूमिका आहेत त्या प्रमाणेच अनेक दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा(vijay devrakonda) याआधी कधीही न पाहिलेल्या अश्या वेगळ्या लुक मध्ये दिसत आहे. त्याच बरोबर मुंबई(mumbai), अमेरिका(america), लास वेगास आणि हैद्राबाद या ठिकाणी ‘लायगर’ या चित्रपटाचं शूटिंग झाले आहे.

 

आणखी वाचा – डॉ.अमोल कोल्हे साकारणार ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात शिवरायांची भूमिका

 

‘लायगर'(Liger) चित्रपटामध्ये रम्या कृष्णन, रोनित रॉय, मकरंद सेशपांडे(makarand deshpande), विशू रेड्डी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी चित्रपट गुहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर(movie poster) रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्येही आहे.