Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन HBD: सुपरस्टार विजयने कोणत्याही अभिनेत्रीशी नाही तर फॅन सोबतच केले लग्न !

HBD: सुपरस्टार विजयने कोणत्याही अभिनेत्रीशी नाही तर फॅन सोबतच केले लग्न !

बॉलिवूड मधिल दिग्गज अभिनेत्री प्रियांका चोपड़ाने विजय सोबत आपल्या फिल्मी करीयरला सुरुवात केली होती.

Related Story

- Advertisement -

दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार विजय चंद्रशेखरचा आज वाढदिवस आहे. विजयने आपल्या अभिनय कलेच्या जोरावर एकूण-एक बॉल्कबस्टर सिनेमे दिले आहेत. आज विजय त्याच्या 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या बद्दल काही खास गोष्ट जाणून घेणार आहोत.विजयने इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.पण खुप कमी लोकांना माहिती आहे की बॉलिवूड मधिल दिग्गज अभिनेत्री प्रियांका चोपड़ाने विजय सोबत आपल्या फिल्मी करीयरला सुरुवात केली होती. प्रिंयका आणि विजय तमिल फिल्म ‘Thamizhan’ मध्ये एकत्र झळकले होते. तसेच हा सिनेमा 2002 साली प्रदर्शित झाला होता.इतकेच नाही तर विजयने सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी सोबत देखिल काम केलं आहे. विजयच्या लुकवर तसेच अभिनयावर घायाळ होणाऱ्या अभिनेत्रींच्या रांगा लागल्या आहेत. पण त्याचे प्रेम एका साधरण मुलीवर जडले होते.

- Advertisement -

विजयच्या पत्नीचे नाव संगिता आहे. दोघेही सुखी संसारात रमले आहेत.तसेच विजयला दोन मुलं देखिल आहेत. विजय आणि संगिताची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी ड्रामापेक्षा कमी नाहीये. विजयने रुपेरी पडद्यापवर भलेही दिग्गज,हॉट,सुंदर अभिनेत्री सोबत रोमांन्स केला असेल पण खऱ्या आयुष्यात त्याचे प्रेम त्याच्या फॅन्सवर जडले होते आणि त्या दोघांनी लग्न केलं. संगिता परदेशात युकेमध्ये राहत होती आणि ती विजयची खुप मोठी चाहती होती. संगिताने एके दिवस विजयच्या सिनेमाच्या सेटवर त्याला भेटण्यास आली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. दोघेही एकमेकांना पसंत करु लागली.एके दिवशी विजयच्या वडीलांनी संगिताला घरी बोलावून विजयसोबत लग्न करण्यासाठी मागणी घातली. संगिताने याला होकार दिला आणि 25 ऑगस्ट 1999 साली विजय आणि संगिताचे धुम-धडाक्यात लग्न झाले.


हे हि वाचा – ‘मराठी बिग बॉस 3’ चा नवा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला


- Advertisement -

 

- Advertisement -