Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनvijay thalapathy : विजय थलापतीचा ब्लॉकबस्टर 'बीस्ट'चा वर्ल्ड मराठी प्रीमियर

vijay thalapathy : विजय थलापतीचा ब्लॉकबस्टर ‘बीस्ट’चा वर्ल्ड मराठी प्रीमियर

Subscribe

‘जेलर’च्या भरघोस यशानंतर सन मराठी वाहिनी सादर करीत आहे सुपरस्टार विजय थलापतीचा सुपरहिट चित्रपट ‘बीस्ट’ चा वर्ल्ड मराठी प्रीमियर! रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी ७:०० वाजता. पूजा हेगडे, सेल्वा राघवन, अंकुर विक आणि बऱ्याच दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनयाचा अनुभव मराठी भाषेत घेण्यासाठी सज्ज व्हा.

ॲक्शन आणि ड्रामाचा दमदार अंदाज म्हणजे ‘बीस्ट’ हा चित्रपट. ज्यात विर राघवनच्या भूमिकेत विजय थलापती पाहायला मिळणार आहे. यामध्ये विजय थलापतीच्या असलेल्या लूकने चाहत्यांची मनं जिंकून घेतली. चित्रपटात विर राघवन हा ‘रॉ’ चा अधिकारी तीन महिन्यांपासून एका मिशनची तयारी करत आहे. शेवटच्या क्षणी भारत सरकारने मिशन मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु वीर रघावनने स्वतःच्या बॉसच्या आदेशाविरुद्ध मूळ योजनेनुसार मिशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तो हे मिशन यशस्वीरित्या पार पाडतो, पण या मिशनचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. पुढे जे काही थरारक घडत जातं हे पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक ठरणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत बॉक्स ऑफिसवर तब्बल २५० कोटी कमवले. त्यामुळे मराठीमध्ये हा चित्रपट पाहणं प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

- Advertisement -

म्हणूनच या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रीमियर पाहायला विसरू नका. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘बीस्ट’ चा मराठी वर्ल्ड प्रीमियर २४ नोव्हेंबर रोजी सन मराठीवर.

हेही वाचा : Shri Ganesha : हास्य-विनोदाचा कल्ला करणारा श्री गणेशा’चा टिझर

- Advertisement -

Edited By – Tanvi Gudaye

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -