घरमनोरंजन#MeToo :विकास बहलनं फेटाळले लैंगिक अत्याचाराचे आरोप

#MeToo :विकास बहलनं फेटाळले लैंगिक अत्याचाराचे आरोप

Subscribe

विकास बहलनं त्याच्यावर झालेले लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याप्रकारचं स्पष्टीकरण त्यानं इंडियन फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन असोसिएशनकडे दिले आहे.

फिल्म मेकर विकास बहलनं त्याच्यावर झालेले लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. इंडियन फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन असोसिएशनकडे त्याने हे स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान क्वीन चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान विकासनं स्पर्श केल्याचा आरोप कंगना राणौतने केला. त्यानंतर एकच वादळ उठलं. पण, हे सारे आरोप चुकीचे असल्याचे विकास बहलनं म्हटलं आहे. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये #MeTooच्या माध्यमातून सध्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लौंगिक अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या आहेत. त्यामध्ये कंगनाने विकास बहलवर देखील आरोप केले. त्याशिवाय, आलोकनाथ, अनु मलिक यांच्यावर देखील झालेल्या आरोपानं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली. या साऱ्या प्रकारणानंतर प्रत्येक क्षेत्रातील महिला आता पुढे येऊन लैंगिक अत्याचाराबद्दल बोलत आहेत.

वाचा – #Metoo विरूद्ध #Mentoo

अनेकांनी फोडली अत्याचाराला वाचा

सिनेक्षेत्रासह शिक्षण आणि नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावा वाचा फोडली आहे. पुण्यातील सिमबायोसीसमधील विद्यार्थिनींनी देखील प्राध्यापकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. शिवाय मुंबई पालिकेतील देखील अत्याचाराबद्दल आपलं महानगरनं वृत्त दिलं. आज घडीला स्त्रीया पुढे येऊन याबद्दल बोलताना दिसत आहेत.

- Advertisement -

वाचा – #Metoo : ‘१० वर्षानी आवाज उठवणं चुकीचं’

गैरवापर नको

दरम्यान, स्त्रीयांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी पण पुरूषावर देखील अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे मत आता #MeToo बद्दल व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात जनमानसात देखील उलट-सुलट चर्चा रंगताना दिसत आहेत.

वाचा – अखेर रजनीकांत #MeToo चळवळीबद्दल बोलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -