घरताज्या घडामोडीएनकाऊन्टर विकास दुबेचा पण चर्चा मात्र रोहित शेट्टीची!

एनकाऊन्टर विकास दुबेचा पण चर्चा मात्र रोहित शेट्टीची!

Subscribe

आज कुख्यात गुंड विकास दुबे एनकाऊन्टरमध्ये मारला गेला. त्यानंतर मात्र विकास दुबे इतकीच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली. कारण रोहितच्या अनेक सिनेमांमध्ये पोलीस आणि गुंडांमधील चकमक दाखवण्यात आली आहे. अनेक सिनेमात एनकाउन्टरही दाखवण्यात आले आहे. याचमुळे रोहित शेट्टी सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे.

- Advertisement -

ट्विटरवर एका युजरने लिहीले आहे की, ‘आता रोहित शेट्टी म्हणेल ही तर माझ्याच सिनेमाची कथा आहे…’  तर दुसऱ्या युझरने ट्वीटला रिप्लाय देताना म्हटलं आहे की, ‘ज्या पद्धतीने गाडी उलटी झाली, मला वाटतं की रोहित शेट्टीला या स्क्रिप्टसाठी बोलावण्यात आलं होतं.’ तर एक युजर म्हणतो, आज रोहित शेट्टीला सर्वाधिक आनंद झाला असेल. तो आता सूर्यवंशीचा पुढचा भागही तयार करू शकतो. मस्त फिल्मी एनकाउन्टर होता… शाब्बास पोलीस…’

- Advertisement -

कुख्यात गुंड विकास दुबे कानपूर पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. काल विकास दुबेला अटक करण्यात आली होती. आज सकाळी उत्तर प्रदेशची स्पेशल फोर्स टीम त्यांना मध्य प्रदेशच्या उजैवमधून कानपूर येथे आणत असताना गाडीचा अपघात झाला. या दरम्यान, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मारला गेला.


हे ही वाचा – ‘त्या’ नराधमाने चिमुरडीचा चावा घेतला, बलात्कार केला आणि विहीरीत फेकून दिले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -