‘ती’ संधी साधू नाही तर खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे—एक्स बॉयफ्रेंड विक्रम भट्टकडून सुष्मिताची पाठराखण

सुष्मिताचे एक्स बॉयफ्रेंड चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी ती संधी साधू व्यक्ती नसून मोठ्या मनाची व्यक्ती आहे जी खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असे म्हटले आहे.

विश्वसुंदरी सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेयरवरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. सुष्मिता सारख्या सुंदर आणि बु्द्धीमान अभिनेत्रीने तिच्या वयाहून १० वर्षांनी मोठ्या असलेल्या ललित मोदींच्या प्रेमात पडावं हे अनेकांना पटत नाहीये. यामुळे सुष्मिताने ललित मोदी यांच्याबरोबर पैशांसाठी मैत्री केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वादात आता सुष्मिताचे एक्स बॉयफ्रेंड चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी उडी घेतली असून ती संधी साधू व्यक्ती नसून मोठ्या मनाची व्यक्ती आहे जी खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असे म्हटले आहे.

तसेच सुष्मिताला गोल्ड डिगर म्हणजे संधी साधू , पैशांची लोभी बोलणाऱ्यांचाही भट्ट यांनी समाचार घेतला आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत भट्ट यांनी सु्ष्मिताबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. सुष्मिता ही अशी शेवटची व्यक्ती आहे जिने कधीही पैशांसाठी कोणाबरोबरही नाते जोडलेले नाही. कोणाच्याही प्रेमात पडण्याआधी त्याचा बँक बँलन्स चेक न करणारी सुष्मिता ही एकमेव आहे. सुष्मिताबरोबर जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यावेळी मी गुलाम या चित्रपटाचा दिग्दर्शन करत होतो. त्यावेळी सुष्मिता हीच एकमेव व्यक्ती होती जी मला स्वताच्या खर्चातून अमेरिकेला घेऊन गेली. जेव्हा आम्ही लॉज एंजेलिसला पोहचलो तेव्हा तिथे एक महागडी लिमोजिन कार उभी होती. ती बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यावर सुष्मिताने मला सांगितले की तिला माझी अमेरिकेतील एन्ट्री खूपच खास करायची होती. असे भट्ट यांनी सांगितले.

सुष्मिताची पाठराखण करताना भट्ट म्हणाले की हल्ली लोकांच्या आयुष्याची चेष्टा करणं हे मनोरंजन झालं आहे. एखाद्याच्या आय़ुष्यात घडलेली वाईट घटना ही देखील टाईमपासचा विष्य बनते. करीनाने जेव्हा सैफबरोबर लग्न केलं तेव्हा तिलाही असंच ट्रोल करण्यात आलं. त्यात जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुमचे काही निर्णय यूजर्ससाठी मजेशीर होतात. पण सुष्मिता सोन्याच्या नाही तर प्रेमाच्या शोधात असते. यावेळी विक्रम भट्ट यांनी सु्ष्मिताची भेट २००६-२००७ साली झाल्याचं सांगितलं. तसेच आम्ही संपर्कात नसतो. पण एकमेकांचा आदर करतो. तिने ज्या पद्धतीने मला साथ दिली ते आपण कधीच विसरू शकणार नाही. यामुळे तिला मी कधीच विसरू शकत नाही. तिच्या मी नेहमीच पाठीशी असेन असेही भट्ट यांनी म्हटले आहे. सुष्मिता आणि विक्रम भट्ट यांचे नाते अवघे दोन वर्ष टिकले. ११९६ साली दोघांनी आपले वेगळे मार्ग निवडले. पण आज जेव्हा सुष्मितावर टीका होऊ लागली आहे तेव्हा भट्ट तिच्या समर्थनासाठी समोर आले आहेत.