Vikram VS Major VS Samrat Prithviraj : ‘फ्रायडे’ला बॉक्स ऑफिसवर ‘काटे की टक्कर’; कोणता सिनेमा ठरणार ‘सुपरहिट’

एकेकाळी हिंदी चित्रपटांसमोर इतर भाषिक सिनेमे फ्लॉप ठरत होते, मात्र आता उलट बॉलिवूड चित्रपटांसमोर केवळ साऊथचं नाही तर पंजाबी चित्रपटही चांगली कामगिरी करत आहेत.

Vikram VS Major VS Samrat Prithviraj this friday there will be a clash between these three films who will be
Vikram VS Major VS Samrat Prithviraj : फ्रायडेला बॉक्स ऑफिस बड्या स्टार्समध्ये होणार 'काटे की डक्कर'; कोण ठरणार 'सुपरहिट'

कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनंतर चित्रपटसृष्टी रंगत असून देशभरातील चित्रपटगृहे पुन्हा गजबजू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून थिएटरमध्ये अॅक्शन असो वा रोमाँटिक असे सर्वच प्रकारचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, या चित्रपटांना प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळतोय. एकेकाळी हिंदी चित्रपटांसमोर इतर भाषिक सिनेमे फ्लॉप ठरत होते, मात्र आता उलट बॉलिवूड चित्रपटांसमोर केवळ साऊथचं नाही तर पंजाबी चित्रपटही चांगली कामगिरी करत आहेत.

बॉलिवूड चित्रपट धोक्यात?

एक- दोन बॉलिवूड चित्रपट सोडले तर आता अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत. 2022 मध्ये गंगूबाई काठियावाडी, द कश्मीर फाईल्स आणि भूल भूलैय्या 2 सोडले तर सर्वच हिंदी चित्रपट आपटले. यामध्ये झुंड, रनवे 34, बच्चन पांडे, जयेशभाई जोरदार, धाकड, जर्सी आणि हिरोपंती 2 यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यात आता जवळपास दर शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये या दोन चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळते.

हे तीन चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित

आता या शुक्रवारी म्हणजेच उद्या पुन्हा एकदा बॉलिवूडविरुद्ध साऊथ अशी टक्कर पाहायला मिळणार आहे. 3 जून रोजी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, कमल हासनचा ‘विक्रम’ आणि आदिवी शेषचा ‘मेजर’ यांच्यात टक्कर पाहायला मिळणार आहे. या तीन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’चे अॅडव्हान्स बुकिंग

अक्षय कुमारचा मेगा बजेट ऐतिहासिक चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ 3 जून रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. ‘बच्चन पांडे’ फ्लॉप झाल्यानंतर खिलाडी अक्षय पुन्हा कमबॅक करणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अक्षयचे चाहते बऱ्याच दिवसांपासून ‘सम्राट पृथ्वीराज’च्या रिलीजची वाट पाहत आहेत. दरम्यान, यूपीमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.

दुसरीकडे, अक्षय कुमार व्यतिरिक्त, सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर, ललित तिवारी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 300 कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे.

‘विक्रम’बद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ

साऊथचा सुपरस्टार कमल हासनच्या ‘विक्रम’ या चित्रपटाबाबतही चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळतेय. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात कमल हसन अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट पहिल्या दिवशी संपूर्ण भारतात 40 ते 45 कोटींचा व्यवसाय करू शकतो.

असे झाल्यास निर्मात्यांसाठी ही बंपर ओपनिंग असेल. कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, फहद फासिल सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय अभिनेता सुर्या या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार असल्याची चर्चा आहे.

26/11 मधील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर जीवनावर आधारित ‘मेजर’

आदिवी शेषचा आगामी चित्रपट ‘मेजर’ उद्या म्हणजेच 3 जून रोजी ‘विक्रम’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबईवरील 26/11 च्या भीषण हल्ल्याचे भयानक चित्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात आदिती शेषशिवाय सई मांजरेकर आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

पहिल्या दिवशी हा चित्रपट 15-20 कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट ‘सुपरहिट’ ठरणार येत्या काळात स्पष्ट होईल.


परवानगीशिवाय गाणं प्रदर्शित केल्यास कारवाई करू, सिद्धूच्या कुटुंबियांकडून निर्मात्यांना सूचना