घरमनोरंजन'12th Fail'फेम विक्रांतच्या लेकाची पहिली झलक नावही केलं जाहीर

’12th Fail’फेम विक्रांतच्या लेकाची पहिली झलक नावही केलं जाहीर

Subscribe

’12th Fail’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विक्रांत मेस्सी काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 7 फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तेव्हापासून विक्रांतचे चाहते त्याच्या चिमुकल्या लेकाला पाहण्यासाठी उत्सुक होते. आता विक्रांतनं त्याच्या चाहत्यांना त्याच्या मुलाची पहिली झलक दाखवली आहे. विक्रांतनं त्याच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करुन विक्रांतनं त्याच्या मुलाच्या नावाबद्दल देखील सांगितलं आहे.

विक्रांतनं शेअर केला फोटो

अभिनेता विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या 16 दिवसांनंतर पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. फोटोमध्ये विक्रांत फिकट गुलाबी रंगाचा कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर पत्नी त्याला मॅचिंग अशा फिटक गुलाबी रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. विक्रांतने पत्नीसह आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याची पत्नी शीतलने बाळाला कुशीत घेतलं आहे. बाळाचा चेहरा नीट पाहायला मिळत नाहीय. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिघं खुप सुंदर दिसत आहेत. हा खास फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये बाळाच्या नावाची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

- Advertisement -

विक्रांतच्या बाळाचं नाव

विक्रांतनं त्याच्या मुलाचा आणि पत्नीचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “आम्ही आमच्या मुलाचे नाव वरदान ठेवले आहे..” विक्रांतनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

विक्रांतचा आगामी चित्रपट

’12वी फेल’ या चित्रपटामुळे विक्रांतला विशेष लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. विक्रांत लवकरच एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या राजकीय थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित आहे. विक्रांतच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

काही दिवसांपूर्वी विक्रांत ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ शोमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा त्याने टेलिव्हिजन का सोडलं? यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला की, जेव्हा छोटा पडदा सोडून मोठ्या पडद्यावर नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्याकडे महिन्याला ३५ लाखाचा करार होता. पण त्याने तो करार नाकारला. कारण त्याला टेलिव्हिजनवर काम करून समाधान मिळतं नव्हतं. यामुळे अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये पाय ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -