HomeमनोरंजनVikrant Massy : विक्रांत मेस्सीचा इंडस्ट्रीला अलविदा? विक्रांतची शॉकिंग पोस्ट

Vikrant Massy : विक्रांत मेस्सीचा इंडस्ट्रीला अलविदा? विक्रांतची शॉकिंग पोस्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी यांने एक मोठी घोषणा केली आहे. विक्रांतने इन्स्टाग्राम पोस्ट करत तो अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे, ‘12th फेल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी याने प्रेक्षकांना त्याचा धक्कादायक निर्णय सांगितला आहे.

विक्रांतने अभिनयातून ब्रेक घेत इंडस्ट्री सोडण्याबद्दल या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याच्या रिटायरमेंटच्या या घोषणेमुळे अनेक सेलिब्रिटींसह चाहतेही हैराण झाले आहेत. सध्या तो करिअमध्ये चांगलाच यशस्वी ठरत असतानाच विक्रांतने हा निर्णय जाहीर केला आहे

विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिल की..“माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे,” असं विक्रांत मॅसीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. पुढे त्याने लिहिलं, “योग्य वेळ येईपर्यंत, येत्या 2025 मध्ये आपण एकदा शेवटचं भेटू. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा काय ऋणी राहीन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

टीव्ही मालिका ते चित्रपट असा विक्रांत मॅसीचा प्रवास राहिला. छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या विक्रांतने अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान व चाहतावर्ग निर्माण केला. विक्रांतने 2013 मध्ये ‘लुटेरा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या सिनेमात त्याने देवदास मुखर्जीची भूमिका साकारली होती. आपल्या 20 वर्षांच्या प्रवासात विक्रांतने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यातील काही हिट तर काही फ्लॉपही ठरले. पण गेल्या वर्षी रिलीज झालेला ’12वी फेल’ हा त्याच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. नुकताच प्रदर्शित झालेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट ही चांगला जम जमवतोय. सर्व काही उत्तम चालू असताना विक्रांतच्या या पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.