घरमनोरंजनविनोद खन्नाच्या पत्नी गीतांजलीचे निधन

विनोद खन्नाच्या पत्नी गीतांजलीचे निधन

Subscribe

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे १५ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे शनिवार, १५ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. यांच्यामागे अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी दोन मुलं आहेत. अलिबागमधील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज, रविवारी सकाळी गीतांजली खन्ना यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही दोन्ही मुले सोबत होती.

…आणि घेतला घटस्फोट 

१९७१ मध्ये विनोद खन्ना यांनी गीतांजलीसोबत लग्न केले होते. पण अचानक विनोद खन्ना आपले फिल्मी करिअर, कुटुंब सगळे काही मागे सोडून ओशोच्या सेवेत लागले. ओशोच्या सेवेत ते असे काही गुंतले की, त्यांनी कुटुंबापासून फारकत घेतली. सगळे काही सोडून विनोद यांनी अमेरिकेत ओशो कम्युन रजनीशपूरममध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गीतांजली यांच्यासाठी हा निर्णय धक्कादायक होता. विनोद यांच्या या निर्णयाने गीतांजली यांनी अक्षय आणि राहुल या दोन मुलांना घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी विनोद यांना घटस्फोट दिला. अर्थात या घटस्फोटानंतर पाच वर्षांनी विनोद खन्ना मुंबईला परतले आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

विनोद खन्नाचे दुसरे लग्न

१९९० मध्ये त्यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले. परंतू पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी पित्याचे कर्तव्य निभावले. अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये लॉंच करण्यासाठी त्यांनी ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट बनवला. राहुलचे करिअरही त्यांनी मार्गी लावले. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -