Vir Das : काही झालं तरी थांबणार नाही, काम सुरुच ठेवणार, वादानंतर वीर दासचे स्पष्टीकरण

vir das cleared controvarsial poemVir Das talks about his Two Indias monologue, ‘I am here to do my job. I won't stop’
Vir Das : काही झालं तरी थांबणार नाही काम सुरुच ठेवणार, वादानंतर वीर दासचे स्पष्टीकरण

अमेरिकेतील एका कॉमेडी शोमध्ये भारताविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास चांगलाच चर्चेत आला आहे. एका कवितेच्या माध्यमातून वीर दासने भारतीय स्त्रियांपासून ते पंतप्रधान मोदी आणि एकूण भारतीय व्यवस्थेविरोधात टीपण्णी केली होती. यामुळे देशभरातून वीर दासविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर आता कॉमेडियन वीर दासने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ‘काही झाले तरी आता थांबणार नाही, काम सुरु ठेवणार’ असे वीर दासने म्हटले आहे.

अमेरिकेतील जॉन कॅनेडी सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात वीर दासने एका कवितेतून भारतात दिवसा महिलांची पूजा केली जाते पण रात्री त्याच स्त्रियांवर बलात्कार होतो. यासह भारतीय पत्रकारिता, पीएम केअर फंड, बॉलिवूड, भारतातील कोरोना अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. भारतात असलेला विरोधाभास त्याने या कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. यामुळे वीर दासविरोधात दोन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी थेटपणे मुद्दा मांडल्याने वीर दासचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी त्यांच्यावर जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर वीर दासविरोधात अनेक तकारी दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आता वीर दासने आपले मत आणि स्पष्टीकरण नोंदवले आहे.

‘काही झाले तरी थांबणार नाही’

“मी इथे काम करण्यासाठी आलोय आणि ते काम मी या पुढेही सुरु ठेवेन. लोकांना हसवण्यासाठी आणि त्यांच्यातील प्रेमभाव वाढवण्यासाठी भारतात अनेक कॉमेडी क्लब सुरु करण्याची गरज आहे. माझे काम लोकांना हसवणे आहे. पण जर तुम्हाला हे योग्य वाटत नसेल तर हसू नका. मी आत्तापर्यंत कधीही सेन्सरशिपचा सामना केला नाही.” अशा शब्दात वीर दासने आपले मत जाहीर कले आहे.

वीर दासच्या वादग्रस्त कवितेतील काही ओळी

मी अशा भारतातून आलोय जेथे मुलांना मास्क धरुन खेळतात, मात्र नेते विनामास्क गाठीभेटी घेतात.
मी अशा भारतातून आलोय ज्याठिकाणी एक्यूआय (AQI) 9000 आहे, तरीही रात्री छतावर झोपून आम्ही चांदण्या मोजतो.

मी अशा भारतातून आलोय, जिथे लोक दिवसा स्त्रीयाची पूजा करतात आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो.

मी अशा भारतातून आलोय, ज्याठिकाणी शाकाहारी असल्याचं अभिमान असल्याचे म्हणतात, पण त्याच भाज्या उगवणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र चिरडलं जातय.

मी अशा भारतातून आलोय, ज्याठिकाणी आम्हाला पंतप्रधानांसंबंधित सगळी माहिती दिली जाते, पण पीएम केअर्सबाबत काहीच माहिती दिली जात नाही.

मी अशा भारतातून आलोय, ज्याठिकाणी पत्रकारिता संपली असून पुरुष पत्रकार एकमेकांची केवळ वाहवा करतात, तर महिला पत्रकार रस्त्यांवर लॅपटॉप घेऊन सत्य सांगतात.

वीर दासने या कवितेचा एक व्हिडिओ त्याच्या यूट्यूब अकाउंटवर देखील शेअर केला आहे, त्यामुळे वीर दासविरोधात आता अनेक टीका केली जात आहे.