Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन राहुल वैद्यने गुपचुप उरकले लग्न, व्हायरल फोटो मागील खुलासा उघड

राहुल वैद्यने गुपचुप उरकले लग्न, व्हायरल फोटो मागील खुलासा उघड

सिंगर राहुल वैद्य याने दिशा परमारला शो दरम्यान लग्न करण्यासाठी प्रपोज केल होत.

Related Story

- Advertisement -

बिग बॅास या वादग्रस्त शो दरम्यान प्रसिध्दीच्या झोतात आलेला सिंगर राहुल वैद्य याने दिशा परमारला शो दरम्यान लग्न करण्यासाठी प्रपोज केल होत. तसेच त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी दिशा बिग बॅासच्या घरात देखिल आली होती.

 

- Advertisement -

इंडियन आइडल तसेच बिग बॅास फेम सिंगर राहुल वैद्यच्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटो पाहुन चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी लग्नगाठ बांधली असल्याची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगल्या आहे.

- Advertisement -

बिग बॅासच्या एका एपिसोड दरम्यान राहुलने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार हिला लग्नासाठी प्रपोज केले होते. यानंतर दिशा आणि राहुल यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा सोशल मिडियावर रंगू लागल्या होत्या.

चाहते त्यांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत होते. सध्या दोघांनी कोणालाही नकळवता गुपचूप लग्न केलं असे चाहत्यांना वाटत आहे.

पण आता याचा खुलासा झाला आहे. कदाचित व्हायरल झालेले फोटोज हे त्यांच्या लग्नाचे नसून त्यांचा आगामी व्हिडियो साँगच्या चित्रीकरणातील लग्नाच्या काही सीन्स आहेत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अद्याप दोघांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही आहे.


हे हि वाचा- कॉमेडियन कपिल शर्मा ने जाहिर केले मुलाचे नाव

- Advertisement -