Viral Video : याच्यापुढे खरी चंद्रा पण फिकी… मुलाचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली. सध्या अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जून लावलं जातं. सोशल मीडियावर या गाण्याच्या तालावर नाचणारे अनेक रिल्स आणि विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. महिला असो किंवा पुरुष प्रत्येकजण या गाण्याच्या तालावर बेभान होऊन नाचतो. अशातच याचं गाण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एका शाळेत सुरु असलेल्या गॅदरींगच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमधील लहान मुलगा बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या गाण्यामध्ये एका शाळेतील गॅदरींगच्या कार्यक्रमात स्टेजवर काही मुली नाचताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे प्रेक्षकांमध्ये उभा असलेला लहान मुलगा या गाण्यावर नाचत आहे. त्याच्या डान्सला त्याच्या आजूबाजूच्या मुलींनी देखील चांगलं प्रोत्साहन दिलं.

या व्हिडीओतील मुलाच्या अदाकारीने अनेकांचे लक्ष वेधलं आहे. या व्हायरल व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करुन प्रतिक्रिया देत आहेत. या मुलाने स्टेजवर नाचणाऱ्यांनाही फिकं पाडलं असल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.

 


हेही वाचा :

6 व्या दिवशी ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या कमाईत घसरण