घरमनोरंजन'मुझे भाभी मत कहना' ; सांगतेय दीपिका पदुकोण

‘मुझे भाभी मत कहना’ ; सांगतेय दीपिका पदुकोण

Subscribe

मुंबईतील रिस्पेशनला आलेल्या पत्रकारांनी 'भैय्या-भाभी' अशी हाक मारायला सुरुवात केल्यानंतर, दीपिका आणि रणवीरला हसू आवरलं नाही.

बॉलीवूडचं हॉट अॅण्ड सिझलींग कपल अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये ग्रँड वेडिंग करुन परतलेल्या या दीप-वीरने त्यांच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन बंगळुरू येथे ठेवलं होतं. या रिसेप्शनला दीपिका आणि रणवीरचे कुटुंबिय आणि त्यांच्या जवळचे अन्य लोक उपस्थित होते. त्यापाठोपाठ काल २८ नोव्हेंबरला मुंबईमध्ये दीप-वीरच्या लग्नाचं दुसर रिसेप्शन पार पडलं. मुंबईच्या एका पंचताराकिंत हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रिसेप्शन सोहळ्याला नातेवाईकांसह दीप-वीरचा मुंबईतील मित्रपरिवार आणि आप्तेष्टही उपस्थित होते. या रिसेप्शनमधील दीपिका आणि रणवीरचे फोटो समोर आल्यानंतर काही वेळातच ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. जगभरातील लोकांनी तसंच दीप-वीरच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला. अवघ्या काही तासांतच दीप-वीरच्या रिसेप्शनचे हे फोटो जगभरात व्हायरल झाले आणि नेटिझन्सकडून त्याला भरभरुन पसंतीही मिळाली.

‘भाभी’ शब्द ऐकून दीपिका म्हणाली…

दीप-वीर यांच्या मुंबईतील रिसेप्शनला पत्रकार आणि फोटोग्राफर्सदेखील उपस्थित होते. दीपिका आणि रणवीर मीडियाच्या लोकांना भेटण्यासाठी येताच, त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि कॅमेराच्या फ्लॅशचा वर्षाव सुरु झाला. त्याठिकाणी
उपस्थित तमाम फोटोग्राफर्स दीपिका आणि रणवीरला कॅमेरामध्ये पाहण्यासाठी हाका मारु लागले. या गोंधळादरम्यान अचानक कुणीतरी ‘रणीवर भय्या आणि दीपिका भाभी’ अशी हाक मारली. त्यानंतर लगेचच हे शब्द धरुन उपस्थित सर्वांनीच ‘दीपिका भाभी’ म्हणण्याचा तगादाच लावला. दरम्यान, भाभी शब्द ऐकल्यानंतर दिपीका आणि रणवीरला हसू आवरलं नाही आणि स्टेजवरच ते दोघं जोरजोरात हसायला लागले. भाभी हा शब्द ऐकून काहीशी लाजलेल्या दीपिकाने सुरुवातील ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि ‘व्हॉट ?’ असा उलट प्रश्न केला. त्यानंतर दिपीकाने पत्रकारांकडे पाहून ‘नो यार ‘ अशी रिअॅक्शन दिली. यावर रणवीर सिंगने दिलेली रिअॅक्शन पाहण्याजोगी होती. रणवीरला बराचवेळ हसणंच आवरत नव्हतं. या संपूर्ण प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.

- Advertisement -

व्हिडिओ सौजन्य- इन्स्टाग्राम

- Advertisement -


रिसेप्शनमधील ‘रॉयल’ लूकची चर्चा

इतकंच नाही तर या फोटोंधील दीप-वीरच्या लूकचीही इंटरनेटवर जबरदस्त चर्चा रंगली होती. रिसेप्शनमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी परिधान केलेल्या डिझाईनर आणि रॉयल कपड्यांमुळे दोघेही एखाद्या शाही घराण्यातील राजा-राणीप्रमाणे दिसत होते. विख्यात फॅशन डिझाईनर सब्यसाची यांनी डिझाईन केलेले कपडे दीप-वीरने परिधान केले होते. दीप-वीरने त्यांच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्यासाठी सब्यसाची यांनीच डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -