Viral Video : ‘पुष्पा’च्या ‘सामी सामी’ गाण्यावर स्पायडरमॅनचे ठुमके

सध्या सोशलमिडियावर स्पायडरमॅनच्या एका व्हिडीओची तुफान चर्चा सुरु आहे. ज्या व्हिडीओमध्ये 'सामी सामी' या गाण्यावर बेधुंद डान्स करताना पाहायला मिळाला आहे. हा स्पायडरमॅनचा सामी सामी डान्सवरचा व्हिडीओ अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू शिरिषनं त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

Viral Video: Spiderman hits back at Pushpa's song 'Sami Sami'
Viral Video : 'पुष्पा'च्या 'सामी सामी' गाण्यावर स्पायडरमॅनचे ठुमके

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणीही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीस येऊन त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. याशिवाय या चित्रपटातील गाणीही तुफान गाजली आहेत. या चित्रपटातील ‘सामी सामी’ आणि ‘ऊं अंटावा’ ही दोन गाणी प्रचंड व्हायरल झाली असून आता या गाण्यावर स्पायडरमॅनने ठुमके दिले आहेत. सध्या सोशलमिडियावर स्पायडरमॅनच्या एका व्हिडीओची तुफान चर्चा सुरु आहे. ज्या व्हिडीओमध्ये ‘सामी सामी’ या गाण्यावर बेधुंद डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा स्पायडरमॅनचा सामी सामी डान्सवरचा व्हिडीओ अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू शिरिषनं त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

स्पायडरमॅन ‘पुष्पा’ या सिनेमाच्या ‘रा रा सामी’ या गाण्यावर डान्स करत आपलं सक्सेस सेलिब्रेट करताना पाहायला मिळत आहे,अशा आशयाचे कॅप्शन अल्लू शिरिषनं व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हा स्पायडरमॅन अल्लू अर्जुन आणि स्पायडर मॅनचा चाहता आहे. या व्हिडीओमध्ये हा चाहता रश्मिका मंदानाची हूकस्टेप करताना पाहायला मिळत आहे. पुष्पा द राईज हा सिनेमा सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. सध्या या सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज करण्यात आला आहे तर, दुसरा भाग 2022 रीलीज करण्यात येईल अशा चर्चा सुरू आहेत.


हेही वाचा – Saina nehwal : साउथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या ‘त्या’ माफीनाम्यावर सायना नेहवाल म्हणाली…