Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉबी देओलला २४ वर्षा आधीच लागली होती कोरोनाची चाहूल

बॉबी देओलला २४ वर्षा आधीच लागली होती कोरोनाची चाहूल

बॉबी देओल अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन ची कोरोना टेस्ट करत आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बॉबी देओलला कोरोना व्हायरस चे नियम आधीपासूनच ठाऊक होते अशी चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

Related Story

- Advertisement -

सोशल मिडीयावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येणे कठीण आहे.कधी एखादा सेलिब्रीटी तर कधी सामान्य माणूस अचानक फेमस होतो कींवा ट्रोल होतो.सध्या सोशल मिडीयावर अभिनेता बॉबी देओल भलताच ट्रेन्ड होताना दिसतोय. बॉबी देओलचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये बॉबी देओल अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन ची कोरोना टेस्ट करत आहे.’और प्यार हो गया’ या चित्रपटातील हा व्हिडीओ असून १९९७ साली हा चित्रपट रिलीज झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Indian Memes (@theindianmemes)

- Advertisement -

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बॉबी देओलला कोरोना व्हायरस चे नियम आधीपासूनच ठाऊक होते अशी चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. चित्रपट रिलीज होऊन २४ वर्ष उलटली आहेत. पण चित्रपटात दाखवण्यात आलेले सिन हे कोरोनाच्या परिस्थितीशी मिळते जूळते आहेत. सोशल डिस्टंसिंग, हात धूणे, क्वारंटाइन,इतकेच नाही तर बॅाबी देओल चक्क ऐश्वर्याची स्वॅब टेस्ट करत आहे. तसेच व्हायरल व्हिडीओ खाली ”टॅग लॅार्ड बॉबी देओल” असं कॅप्शन देखिल लिहलं आहे. एवढच नाही तर, २००८ साली आलेला चमकू या चित्रपटात देखिल बॉबी देओलने वायरलेस एअर पॅाड्स घातले आहेत.अनेक चित्रपटातील काही सीन्स एकत्र करुन हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. बॉबी देओल टाईम ट्रॅव्हलर प्रमाणे गोष्टी करत असल्याचे नेटकरी बोलत आहेत.

वर्कफ्रंट बाबत सांगायचे झाल्यास बॉबी देओलची काही दिवसांपूर्वी आश्रम ही वेब सिरिजचा दूसरा भाग प्रदर्शित झाला होता. तसेच याचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


- Advertisement -

हे ही वाचा- प्रभासने खरेदी केली तब्बल सहा कोटींची कार

- Advertisement -