विरुष्काची वामिकासोबत Halloween Party, पहा फोटो

हॅलीवून पार्टीत मुलांनी खास हॅलीबून ड्रेसिंग देखील केली आहे. बच्चेकंपनीसोबत सर्वांनीच फारच धम्माल केलीय

virat kohli and anushka sharma celebrate Halloween Party with daughter vamika

चाहत्यांची लाडकी जोडी म्हणजेच विराट आणि अनुष्का. दोघेही सध्या टी-२० वर्ल्ड कपनिमित्त दुबईमध्ये असून दोघे लेक वामिकासोबत हॅलोवीन पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. नुकतेच हॅलोवीन पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात विराट कोहली अनुष्का शर्मा वामिकासोबत पार्टी करताना दिसत आहेत. केवळ विरुष्काच नाही भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडून आणि त्यांची मुले देखील या पार्टीत सहभागी झाली होती. वामिकाचा फोटो पाहण्यासाठी विरुष्काचे फॅन्स फारच आतुर आहेत मात्र हॅलोवीनच्या पार्टीत देखील वामिकाचा फोटो काही चाहत्यांना पहायला मिळालेला नाही. पार्टीतील फोटोंमध्ये वामिका पाठमोरी बसली आहे तर काही फोटोंमध्ये अनुष्काने तिला हातात धरले आहे.

हॅलीवून पार्टीसाठी अनुष्काने वामिकाला खास पंख असलेल्या परीचा ड्रेस घातला होता. सफेद आणि जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वामिकाचे पाठमोरे फोटो व्हायरल झाले आहेत. अनुष्काने वामिकाचे दोन बो देखील बांधले आहेत. विरुष्कासोबत पार्टीत हार्दीक पांड्या,अश्विन,रोहीत शर्मा यांची मुले देखील सहभागी झाली होती. सर्वांनी पार्टीत धम्माल केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हॅलीवून पार्टीत मुलांनी खास हॅलीबून ड्रेसिंग देखील केली आहे. बच्चेकंपनीसोबत सर्वांनीच फारच धम्माल केल्याचे फोटोमधून लक्षात येत आहे. वामिका पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर हार्दीक पांड्याचा मुलगा अगस्त्यने पांढऱ्या रंगाचा भूताचा ड्रेस घातला होता. भूताच्या वेशातला अगस्त्य फारच क्यूट दिसत होता. ‘माझं छोटं भूत’, असे कॅप्शन देत हार्दीकची पत्नी नताशाने फोटो शेअर केला आहे.


हेही वाचा – शाहरुख खान होणार दिलीप कुमार यांच्या कोट्यवधी संपत्तीचा मालक ?