83 पाहून विराट- अनुष्का रणवीरवर इंम्प्रेस, सोशल मीडियावर केला कौतुकाचा वर्षाव

Virat kohli and Anushka Ranveer Impress Ranveer singh after watching 83 movie
83 पाहून विराट- अनुष्का रणवीरवर इंम्प्रेस, सोशल मीडियावर केला कौतुकाचा वर्षाव

प्रेक्षक अनेक दिवस ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. तो ८३ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड कलाकारही या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूड कलाकारांनीही सिनेमाच्या पहिल्या शोला हजेरी लावत भारताच्या पहिल्या वर्ल्डकपचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. क्रिकेटर विराट कोहलीने देखील सिनेमाचे भरभरुन कौतुक केले आहे. विराट आणि अनुष्का यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमाचा आस्वाद घेत सिनेमाचे आणि रणवीरचे तोंडभरुन कौतुक केले आहे. विरुष्का रणवीरच्या अभिनयाच्या प्रेमात पडले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी रणवीरचे आणि संपूर्ण सिनेमाचे कौतुक केले आहे.

विराट कोहलीने ट्विटरवर ८३ सिनेमाचा रिव्ह्यू देत एक पोस्ट शेअर केली ज्यात रणवीरचे फार कौतुक केले आहे. विराटने म्हटलेय ‘भारतीय क्रिकेटचा इतिहास याहून सुंदररित्या कधीच येऊ शकत नाही. १९८३च्या वर्ल्ड कपशी जोडलेल्या भावना आणि आठवणींना कनेक्ट होणारा ८३ हा सर्वोत्तम सिनेमा आहे’.

तर अभिनेत्री अनुष्काने देखील इन्स्टा स्टोरी शेअर करत रणवीरचे कौतुक आणि सिनेमाविषयी प्रेम व्यक्त केले आहे. ‘सिनेमा पाहताना १९८३च्या वर्ल्डकपचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवत होते. ८३ सिनेमाची संपूर्ण टीम आणि कबीर खान तुम्ही हा इतिहास सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांसाठी आणलात. रणवीरविषयी बोलण्यासाठी शब्द कमी पडतील इतके सुंदर काम सिनेमात केले आहे. तुझ्या अभिनयाने कमाल केली. वेल प्ले ८३’.

८३ हा सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला. देशातील ७१४ थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज करण्यात आला. सिनेमाने पहिल्याच दिवशी १५ करोड रुपयांची कमाई केली. नाताळ आणि विकेंडला सिनेमा आणखी चांगली कमाई करेल यात काही शंका नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थिएटर्स ५० टक्के आसन क्षमतेने सुरू असतानाही हिंदी तसेच मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे.


हेही वाचा – 83 Box Office Collection Day1: पहिल्याच दिवशी ८३ची बॉक्स ऑफिसवर १५ कोटींची कमाई