‘Vamikaचे फोटो विनाकारण पब्लिश करू नका’, लेकीचे फोटो व्हायरल झाल्याने भडकले विराट अनुष्का

आम्हाला अचानक कॅप्चर करण्यात आले. कॅमेरा आमच्यावर आहे हे आम्हाला माहिती नव्हते.वामिकाचे विनाकारण फोटो क्लिक करू नका, असे आवाहन विराट अनुष्काने केले आहे.

virat kohli and anushka sharma reaction after daughter vamika kohli picture viral in india vs south africa match
Vamikaचे फोटो विनाकारण पब्लिश करू नका, लेकीचे फोटो व्हायरल झाल्याने भडकले विराट अनुष्का

रविवारी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  आणि विराट कोहली (Virat Kohli)  यांची लेक वामिकाचा (Vamika)  फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 11जानेवारी 2021 ला वामिकाचा जन्म झाला मात्र वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्काने लेकीला कॅमेरापासून दूर ठेवले होते. लाख प्रयत्न करुनही अखेर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्या दरम्यान स्टेडिअममध्ये वामिकाचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्यात आले आणि चाहत्यांनी पहिल्यांदा वामिकाचा चेहरा पाहिला. या सगळ्या प्रकारामुळे विराट आणि अनुष्का चांगलेच भडकले असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत वामिकाचे फोटो कोणी काढू नये आणि विनाकारण पब्लिश न करण्याचे आवाहन केले आहे. अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिलेय, ‘काल स्टेडिअममध्ये आमच्या मुलीचे फोटो क्लिक करण्यात आले आणि नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले गेले. आम्ही तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्हाला अचानक कॅप्चर करण्यात आले. कॅमेरा आमच्यावर आहे हे आम्हाला माहिती नव्हते. मुलीचे फोटो न काढण्याची आमची भूमिका आणि विनंती ही पूर्वी प्रमाणेच आहे. वामिकाचे विनाकारण फोटो क्लिक करू नका. तिचे फोटो क्लिक केले नाहीत आणि विनाकारण ते सोशल मीडियावर शेअर केले नाहीत तर आम्ही खरोखर त्याचे कौतुक करू’, असे विराट आणि अनुष्काने म्हटले आहे.

वामिकाची पहिली झलक पाहून विरुष्काचे काही चाहते फार खुश झाले होते तर काही चाहत्यांनी वामिकाच्या व्हायरल व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली होती. विराट आणि अनुष्काच्या परवानगी शिवाय फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याचे म्हटले जात होते आणि हे खरे ठरले. आपल्या लेकीचे फोटो कॅप्चर करत असल्याची कल्पना अनुष्काला नसताना त्यांचे फोटो क्लिक करण्यात आले.

विराट आणि अनुष्काच्या आवाहनानंतर त्यांच्या चाहत्यांनी देखील वामिकाचे फोटो डिलीट करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर विराट अनुष्काच्या कट्टर चाहत्यांनी खरोखर वामिकाचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहे. विराट अनुष्का नेहमीच वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात मात्र त्यात ते कधीच तिचा चेहरा दाखवत नाहीत. त्यामुळे कपलने याआधीही अनेक वेळा चाहत्यांना प्रायव्हसी ठेवण्याची विनंती केली आहे.


हेही वाचा – विराट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात तर वामिकाचा फर्स्ट लूक व्हायरल