Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'ये चाँद सा रोशन चेहरा' म्हणत रोमँटिक डान्स, अनुष्काचं सौदर्य पाहून विराट...

‘ये चाँद सा रोशन चेहरा’ म्हणत रोमँटिक डान्स, अनुष्काचं सौदर्य पाहून विराट घायाळ

'ये चाँद सा रोशन चेहरा' या गाण्यावरचा विरुष्काचा डान्स त्यांच्या चाहत्यांची मने जिंकून गेला

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा( Anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohli) हे क्यूट कपल नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. दोघेही आपल्या मुलीच्या जन्मानंतर एकमेकांसोबत क्विलिटी टाइम स्पेंड करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही सोशल मीडियावर धम्माल करताना दिसत आहेत. नुकताच विरुष्काचा एक क्यूट व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात दोघेही रोमँटिक होऊन रेट्रो साँगवर नाचताना दिसत आहेत. ‘ये चाँद सा रोशन चेहरा’ या गाण्यावरचा विरुष्काचा डान्स त्यांच्या चाहत्यांची मने जिंकून गेला आहे. सध्या त्यांच्या या डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (Virat kohli and Anushka sharma romantic dance to the song ‘Yeh Chand Sa Roshan Chehra’)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

विरुष्काने त्यांच्या सोशल मीडियावरुन त्यांचा हा रोमँटिक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. विराट अनुष्काने नुकतेच Lux या ब्रँडसाठी एकत्र काम केले आहे. त्यात त्याचा हा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला आहे. या व्हिडिओत अनुष्का बाथरुममधून बाहेर येते. अनुष्काचे गुलाबी रंगाच्या वन पीसमधील सौदर्य पाहून विराट पुन्हा तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेला पहायला मिळतो. दोघेही रोमँटिक अंदाजात रेट्रो साँग ‘ये चाँद सा रोशन चेहरा’ या गाण्यावर डान्स करतात. ‘शेवटी luxने माझ्याकडून डान्स करुन घेतला’, असे म्हणत हा व्हिडिओ शेअर केला.

विराट अनुष्का आणि एँड फिल्मचा फार जवळचा संबंध आहे. कारण विराट आणि अनुष्काची पहिली भेट देखील एँड फिल्मच्या शुटींगच्या वेळीच झाली होती. तिथेच दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर २०१७मध्ये त्यांनी इटली येथे लग्न केले. आता दोघेही आई बाबा झाले असून आपली लेक विमिकासोबत क्विलिटी टाईम स्पेंड करत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Raj Kundra Case: गहना वशिष्ठला कोर्टाचा दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर ६ ऑगस्टला सुनावणी

- Advertisement -