Happy Birthday Vamika: 1 वर्षांची झाली विरुष्काची वामिका, आफ्रिकेत करणार लेकीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

विरुष्काचा जन्म झाल्यानंतर तिची पहिली झलक पाहण्यासाठी विरुष्काचे चाहते फार आतूर आहेत. अनेकदा विरुष्काला वामिकासोबत स्पॉट करण्यात आले मात्र चाहत्यांना आजवर वामिकाचा चेहरा पहायला मिळालेला नाही.

virat kohli anushka sharma daughter vamika turns 1 year old,celebrate birthday in Africa
Happy Birthday Vamika: 1 वर्षांची झाली विरुष्काची वामिका, आफ्रिकेत करणार लेकीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma )   आणि विराट कोहलीसाठी (Virat Kohli )  जानेवारी महिना खास आहे. कारण 11जानेवारीला विरुष्काची (Virushka )  लाडकी लेक वामिका (Vamika)  एक वर्षांची झाली आहे. आज वामिकाचा पहिला वाढदिवस आहे. विराट आणि अनुष्का दोघांनीही त्यांच्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या विराट अनुष्का आफ्रिकेत असून न्यूइअर सेलिब्रेशन देखील दोघांनी आफ्रिकेत केले होते आणि आता लेकीचा पहिला वाढदिवस देखील ते आता आफ्रिकेतच साजरा करणार आहेत.

वामिकाला पाहण्यासाठी चाहते आतूर 

विरुष्काचा जन्म झाल्यानंतर तिची पहिली झलक पाहण्यासाठी विरुष्काचे चाहते फार आतूर आहेत. अनेकदा विरुष्काला वामिकासोबत स्पॉट करण्यात आले मात्र चाहत्यांना आजवर वामिकाचा चेहरा पहायला मिळालेला नाही. वामिका मोठी होत नाही तोवर तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नाही असा निर्णय विराट आणि अनुष्काने घेतला आहे. वामिका ही हुबेहूब अनुष्कासारखी दिसते असे म्हटले जात आहे. त्यामुळे वामिकाला पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतूर आहेत.

वामिकाच्या जन्मानंतर विरुष्काच्या आयुष्यात मोठे बदल  

विरुष्काच्या आयुष्यात वामिकाची एंट्री ही दोघांसाठी फार महत्त्वाचा क्षण होता. वामिकाच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्काच्या आयुष्यात मागच्या वर्षभरापासून अनेक मोठे बदल झाले आहेत. 11 डिसेंबर 2017 ला विराट आणि अनुष्काने लग्न केले. तर 11 जानेवारी 2021 मध्ये वामिका विरुष्काच्या आयुष्यात आली. वामिका ही विराट अनुष्कासाठी लकी चार्म ठरली. वामिका टीम इंडियासाठी लकी ठरली. भारतीय क्रिकेट संघ आणि वामिकाचे एक वेगळे नाते आहे.

वामिका जन्म 11 जानेवारी 2021मध्ये झाला. तेव्ही टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. भारत त्या दौऱ्यात एडिलेडमध्ये झालेला पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. मात्र मेलबर्नमध्ये झालेला दुसरा टेस्ट सामना भारत धमाकेदार कामगिरी करत जिंकला. मात्र विराट यावेळी या सामन्यात नव्हता. तेव्हा तो वामिकाच्या जन्मासाठी भारतात परतला होता. या सीरीजचा तिसरा टेस्ट सामना सिडनीमघ्ये रंगला होता. त्या दिवशी 11जानेवारी म्हणजे वामिकाचा जन्म झाला होता. तेव्हा ही टेस्ट टीम इंडिया ड्रॉ करुन जिंकली होती.

वामिकाच्या जन्मानंतर विराटने सप्टेंबर महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता. 2014मध्ये धोनीच्या निवृत्तीनंतर विराटच्या हातात भारताच्या कसोटी कर्णधार पदाची धुरा देण्यात आली होती.

 

विराट कोहली इन्स्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोवर्स

२०२१ वर्षात विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केला. इतके फॉलोवर्स असलेला विराट हा पहिला भारतीय क्रिकेटर आणि पहिला आशियाई आहे.

अनुष्काचे ३ वर्षांनी कमबॅक

वामिका आयुष्यात आल्यानंतर आणि येण्याआधी अनुष्काने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. मात्र वामिका आता मोठी झालीये आणि अनुष्का देखील बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालीय. अनुष्काने ३ बिग बजेट सिनेमा साइन केले आहेत. चकदा एक्सप्रेस या सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.


हेही वाचा –  Virat Kohli | विराटच्या सेल्फितली चिमुरडी ‘वामिका’ आहे का ? चाहत्यांना पडलाय प्रश्न