HomeमनोरंजनViral Kohli : विराट कोहली सहकुटुंब वृंदावनमध्ये; प्रेमानंद महाराजांना अनुष्का म्हणाली...

Viral Kohli : विराट कोहली सहकुटुंब वृंदावनमध्ये; प्रेमानंद महाराजांना अनुष्का म्हणाली…

Subscribe

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या दोन्ही मुलांसह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दर्शनासाठी पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यावर, विराट-अनुष्काने वृंदावनमधील प्रेमानंद गोविंद शरण महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आहे. दोघांनी हात जोडून महाराजांना नमस्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला. याचा व्हिडिओ प्रेमानंद महाराजांच्याच सोशल मिडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.

प्रेमानंद महाराजांनी सर्वात आधी विराटला विचारलं, “तू आनंदी आहेस का?” यावर कोहलीने मान हलवत ‘हो’ म्हटलं आणि तो हसताना दिसला. यानंतर अनुष्काने त्यांच्याशी संवाद साधला. अनुष्का प्रेमानंद महाराजांना म्हणाली, “जेव्हा मी मागच्या वेळेला इथे आले होते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते. पण, तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी आधीच ते सगळे प्रश्न विचारले. पुढे अनुष्का महाराजांना म्हणाली की, तुम्ही मला फक्त प्रेम आणि भक्ती द्या.”

यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, “तुम्ही खूप धाडसी आहात कारण, या समाजात एवढा सन्मान मिळाल्यानंतर पुन्हा भक्ती मार्गावर वळणारे फार कमी लोक असतात आणि ते कठीण आहे. मला वाटतं तुमच्या भक्तीचा विशेष प्रभाव पडला.” यावर अनुष्का म्हणाली, “भक्तीपेक्षा मोठी दुसरी कोणतीच गोष्ट या जगात नाही” तेव्हा प्रेमानंद महाराज हसले आणि म्हणाले, “हो…भक्तीपेक्षा मोठं काहीच नाही. देवावर श्रद्धा ठेवा, त्याचं कायम नाव घ्या आणि भरपूर प्रेम आणि आनंदाने जगा.”

 दोघांचा वृंदावनमधील व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा हिने प्रेमानंद महाराज यांच्यासमोर दंडवत घेतला. यासोबतच महाराजांशी बोलतानाही अनुष्का शर्मा ही दिसली आहे. वामिका ही विराट कोहलीच्या मांडीवर बसली तर अनुष्का शर्मा हिच्याजवळ अकाय दिसतोय. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

विराट-अनुष्का च्या या व्हिडिओवर क्रिकेटप्रेमींनी कमेंट्स केल्या आहेत. ‘आता कोहलीचं कमबॅक होणार’, ‘अनेक शतकं झळकावणार कोहली’ अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तसंच विराटला धार्मिक मार्गावर आणण्यासाठी अनेकांनी अनुष्काचं कौतुकही केलं आहे.