घरताज्या घडामोडीअनुष्काच्या आधी ब्राझीलच्या अभिनेत्रीला डेट करत होता विराट कोहली? व्हायरल फोटोंची जोरदार...

अनुष्काच्या आधी ब्राझीलच्या अभिनेत्रीला डेट करत होता विराट कोहली? व्हायरल फोटोंची जोरदार चर्चा

Subscribe

अनुष्काच्या आधी विराट आणि इजाबेल दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते

टिम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli )आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच चाहत्यांच्या गुड बुकमध्ये असतात. दोघांची जोडी फॅन्सना नेहमीच परफेक्ट आयडियस कपल वाटत आली आहे. विराट अनुष्काच्या लग्नाला ३ वर्षे होऊन गेली आहेत. आजही दोघांची लव्ह स्टोरी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. २०१३ पासून विरुष्का एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २०१७मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली. दोघांनाही चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. मात्र एका वृत्तानुसार विराट अनुष्काच्या आधी एका ब्राझील अभिनेत्री सोबत डेट करत होता.असे समोर आले आहे. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इजाबेल लेइट (Izabelle) असे त्या ब्राझील अभिनेत्रीचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये विराट आणि इजाबेल ( Virat Kohli Izabelle aafair) एकत्र दिसत आहेत. विराट आणि इजाबेल एकमेकांना डेट करत होते अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. (Virat Kohli dating Brazilian actress before Anushka Sharma, Photo viral in social media )

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार,इजाबेल ही ब्राझील अभिनेत्री असली तरीही तिने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. २०१२ मध्ये अमिर खानच्या ‘तलाश:द आंसर लाइज विदिन’ या सिनेमात इजाबेल दिसली होती. त्याचबरोबर इजाबेल ही काही हिंदी आणि तेलुगु सिनेमातही दिसली होती. गुरु रंधावासोबत ‘लाहौ’ या म्युझिक व्हिडिओमध्येही इजाबेलने काम केले होते. त्याचप्रमाणे ‘वर्ल्ड फेमस लवर’ या तेलुगु रोमॅटिंक ड्रामामध्येही अभिनेता विजय देवरकोंडासोबत इजाबेल दिसली होती.
अनुष्काच्या आधी विराट आणि इजाबेल दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते अशी माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

अनुष्का आणि विराटने २०१७ साली लग्न केले. लग्नाआधी विराट आणि अनुष्का अनेक वर्ष डेट करत होते. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसून आले होते. २०१३मध्ये एका एँड फिल्मच्या शुटींगच्या वेळी विराट आणि अनुष्का पहिल्यांदा भेटले होते. दोघेही एका शॅम्पू ब्रँडसाठी टिव्ही कर्मशिअल शुटींग करत होते. पुढे दोघांचे सूर जुळले आणि २०१७मध्ये इटलीच्या टस्कनी येथे एका शानदार रिसॉर्टमध्ये दोघांनीही लग्नगाठ बांधली. दोघांच्याही कुटुंबातील काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी विवाह सोहळा पार पाडला. यंदा जानेवारी महिन्यात विरुष्काच्या आयुष्यात एक नवीन पाहुणी आली. दोघेही आई-बाबा झाले. विमाका (Vamika) असे त्यांच्या मुलीचे नाव ठेवण्यात आले. विमाकाची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली होती. मात्र दोघांनीही आपल्या लेकीला लाइम लाईटपासून दूर ठेवले आहे.


हेही वाचा – आदित्य नारायणच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेचा आक्षेप, काय आहे नेमके प्रकरण ?

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -