Virat Kohli | विराटच्या सेल्फितली चिमुरडी ‘वामिका’ आहे का ? चाहत्यांना पडलाय प्रश्न

Virat Kohli's selfie with baby goes viral; Is Wamika? Fans have questions
Virat Kohli | विराटच्या सेल्फितली चिमुरडी वामिका आहे का ? चाहत्यांना पडलाय प्रश्न

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विरुष्का जोडी जशी सोशल मिडियावर चर्चेत असते.त्याचप्रमाणे त्यांची मुलगी वामिका हीसुद्धा नेटकऱ्यांच्या चर्चेत असते.असे असले तरी विराट आणि अनुष्काने अजूनही वामिकाचा चेहरा सोशल मिडियावर एकदाही दाखवला नाही.मात्र सोशल मिडियावर विराट कोहलीचा बाळासोबतचा सेल्फी व्हायरल होत आहे. त्यामुळे या फोटोतील चिमुकली आहे तरी कोण? वामिका आहे का ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या व्हायरल झालेल्या सेल्फीतील चिमुकली ही वामिकाच असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.परंतु,या फोटोतील चिमुकली विरुष्काची वामिका नाही तर,हा विराटचा खूप जुना फोटो आहे.जो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. विराट कोहलीच्या मांडीवर असणारी ही मुलगी माजी क्रिकेटर हरभजन सिंग आणि गीता बसरा यांची मुलगी ‘हिनाया’ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

बॉलिवूडची लाडकी जोडी म्हणजेच विरुष्का (Virushka) दोघेही सध्या मुलगी वामिकासोबत (Vamika) क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत.नेहमीच विरुष्काच्या लेकीची फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. अनुष्का आणि विराट कोहलीने आपल्या परफेक्ट फॅमिलीचा फोटो शेअर करत असतात. विरुष्काच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते खूप आतूर आहेत. अनुष्का नेहमी वामिकाचे फोटो शेअर करत असते ज्यात वामिकाची लहानशी झलक पहायला मिळत असते. अनुष्का विराट आणि वामिका एकमेकांसोबत खेळत असतानाचे फोटो अनेकदा शेअर करते. ज्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पडतो.


हे ही वाचा – जॅकलिन फर्नांडिस सलमानच्या ‘दबंग टूर’मधून आऊट, ही अभिनेत्री होणार सहभागी