घरमनोरंजनलता दीदींना बर्थ डे गिफ्ट! आजवर रिलीज न झालेल्या गाण्याची विशाल भारद्वाज...

लता दीदींना बर्थ डे गिफ्ट! आजवर रिलीज न झालेल्या गाण्याची विशाल भारद्वाज यांनी दिली भेट

Subscribe

लता मंगेशकर यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त तिचे ‘ओके नही लगता’ हे गाणे आज रिलीज झाले आहे. हे गाणे लता मंगेशकरांनी २६ वर्षांपूर्वी गायले होते. लता दीदींच्या आवाजात रेकॉर्ड केलेले हे गाणे काही कारणामुळे रिलीज झाले नाही, जे विशाल भारद्वाज यांनी आज लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी रिलीज केले आहे. लता मंगेशकर यांनी हे गाणे एका चित्रपटासाठी गायले होते, परंतु काही कारणामुळे ते रिलीज होऊ शकले नाही. हे गाणे विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले होते आणि त्याच्या हृदयस्पर्शी ओळी गुलजार यांनी लिहिल्या असल्याचे सांगितले जात आहे. आता बऱ्याच वर्षांनंतर हे गाणे पुन्हा एकदा विशाल भारद्वाजच्या हातात आले आणि त्यांनी हे गाणं लता दीदींच्या वाढदिवशी रिलीज करण्याचे ठरवले.

विशाल भारद्वाज यांनी या गाण्यासाठी एक पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, हे गाणे जवळजवळ दोन दशकांपूर्वी तयार केले गेले होते, जे आता रीओरचेस्ट्रेटसह पुन्हा रिलीज केले गेले आहे. दुर्दैवाने ज्या चित्रपटासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते तो चित्रपट बनवला गेला नाही. जरी त्याला बऱ्याच दिवसांपासून आशा होती की एक दिवस हा चित्रपट नक्कीच बनेल, पण १० वर्षांनंतर हा चित्रपट बनणार नसल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

या गाण्याची भेट मिळाल्यानंतर देखील लता मंगेशकर खूप आनंदी आहेत. लता मंगेशकर यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि लिहिले, ‘त्या वेळी विशाल भारद्वाज नवीन संगीतकार असायचे, पण त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चांगल्या दर्जाची होती. मी माचिस चित्रपटासाठी दोन गाणी गायली होती – ए हवा … आणि पाणी पानी रे … दुसरे गाणे चित्रपटात होते पण पहिले गाणे चित्रपटातून गायब होते कारण परिस्थिती चित्रपटातील गाण्याप्रमाणे नव्हती .त्यानंतर ‘हम ठीक नही लगता’ हे गाणे गाण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो पण तो चित्रपट कधीच बनला नाही. आता बऱ्याच वर्षांनी हे गाणे रिलीज होत आहे, मला आशा आहे की श्रोत्यांना हे गाणे तसेच या गाण्याचे बोल आवडतील.


शिवभोजन मोफत थाळी अन् पार्सलही होणार बंद, १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार १० रुपये

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -