घरमनोरंजनविश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सूरतमधील चित्रपटगृहात फाडले 'पठाण'चे पोस्टर

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सूरतमधील चित्रपटगृहात फाडले ‘पठाण’चे पोस्टर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत असून या चित्रपटाला होणार विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार गुजरातच्या सूरत शहरातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका चित्रपटगृहात घुसून चित्रपटाचे पोस्टर फाडले आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, हा गैरव्यवहार केल्याप्रकरण विश्व हिंदू परिषदेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषदेसोबतच विविध संघटनेच्या नेत्यांनी 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पठाण’ चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ही घटना शनिवारी रात्री सूरतमधील रांदेर परिसरामधील रुपाली चित्रपटगृहात झाली. विश्व हिंदू परिषदेच्या अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमा अंतर्गत बेकायदेशीर जमान, गैरव्यवहार आणि धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘बेशरम रंग’गाण्याला होतोय विरोध

चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

- Advertisement -

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

सिक्कीमच्या जेत्सनने पटकावलं ‘सा रे ग म प’चं विजेतेपद

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -