घरमनोरंजनविश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गुजरातमध्ये 'पठाण'ला करणार नाही विरोध; कारण...

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गुजरातमध्ये ‘पठाण’ला करणार नाही विरोध; कारण…

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत असून या चित्रपटाला होणार विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध केला जात आहे. नुकत्याच मागील एक-दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरत शहरातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका चित्रपटगृहात घुसून चित्रपटाचे पोस्टर फाडले होते. त्यानंतर त्यातील पाच कार्यकर्त्यांना गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली होती. दरम्यान, अशातच आता गुजरातमध्ये या चित्रपटाला विरोध केला जाणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

गुजरातमध्ये बजरंग दल नाही करणार ‘पठाण’ला विरोध

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

मागील अनेक दिवसांपासून काही राज्यांमध्ये ‘पठाण’चित्रपटाला विरोध करणारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आता गुजरातमध्ये चित्रपटाला विरोध करणार नाही. गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक रावल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार पठाण चित्रपटात बदल करण्यात आले आहेत आता हा चित्रपट पाहायचा की नाही ते प्रेक्षकांचे वैयक्तिक मत आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, “‘पठाण’ चित्रपटाला बजरंद दलाने केलेल्या विरोधानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटामधीलअश्लील गाणी, शब्दांना दूर केलं आहे. जी चांगली बातमी आहे. धर्म आणि संस्कृतीची रक्षा करण्याऱ्या सफल संघर्षासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे आणि हिंदू समाजाचे अभिनंदन करतो.”

‘बेशरम रंग’गाण्याला झाला विरोध

चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

 

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सूरतमधील चित्रपटगृहात फाडले ‘पठाण’चे पोस्टर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -